लोकप्रिय मराठमोळी सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित कमालीची सुंदरता आणि आपल्या सहज अभिनयाद्वारे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्ताने तेजस्विनी वेगवेगळ्या रूपात आई शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, स्कंद, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या देवींचे वैशिट्यपूर्ण सादरीकरण करीत समाज प्रबोधनाचेही सत्कार्य करीत असते. असे मानले जाते की माता दुर्गा पृथ्वीवर फिरतात आणि भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, त्यामुळेच या नऊ दिवसांमध्ये भक्त मातेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा करतात.
देवी पुराणानुसार नऊ शक्तींच्या संयोगाला नवरात्री म्हणतात, जे दरवर्षी चैत्र, आषाढ, अश्विन आणि माघ महिन्यात येते. आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्री असे संबोधतात. चला तर जाणून घेऊया या नऊ दिवसांचे महत्व, तेजस्विनीने शेअर केलेल्या फोटोंच्या माध्यमातून. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई शैलपुत्रीची भक्तीचे रूप समजून पूजा केली जाते. हे दुर्गा मातेचे रूप असून ती हिमालय राजा शैलची मुलगी आहे. तिच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ आहे. दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवी शांततेचे रूप मानून पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी. भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने कठोर तप केले होते. माता ब्रह्मचारिणी रूप अतिशय तेजस्वी आहे. डाव्या हातात कमंडल धरले आहे आणि उजव्या हातात तिने माला धरली आहे. तिसरा दिवस चंद्रघंटा देवी ही धैर्याचे रूप मानून पूजा केली जाते. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही शक्तींचा समावेश आहे. चंद्रकोर डोक्यावर सुशोभित असल्याने तिला चंद्रघंटा म्हणतात. या घंटाचा आवाज सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करतो.
चौथा दिवस कुष्मांडा माता, चौथे वार्मथचे रूप कुष्मांडाची पूजा करण्याचा नियम आहे. तिच्या मंद हास्यामुळे विश्वाची निर्मिती झाली म्हणून तिचे नाव कुष्मांडा असे ठेवले गेले. पाचवा दिवस स्कंदमाता तारणहारी पाचवे रूप मानून पूजा केली जाते. ती कुमार कार्तिकेयला आपल्या मांडीवर घेऊन जात आहे आणि कार्तिकेयाचे एक नाव स्कंद आहे. सहावा दिवस देवी कात्यायनीची सामर्थ्य शाली मानून पूजा करतात. तिला चार हात असून वरचा उजवा हात अभय मुद्रामध्ये आहे. नवरात्र सप्तमी तिथीला कालरात्री या शक्ती देवीची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार रक्तबीज नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी हे भयंकर रूप धारण केले आहे. आठवा दिवस महागौरी देवी मुक्तीचे रूप मानले आहे, पांढरे शुभ्र वस्त्र, दागिने घातले असून एक हात अभय मुद्रामध्ये आहे, दुसरा त्रिशूल धारी आहे. नववा दिवस सिद्धिदात्री माता परिपूर्णतेचे रूप असून भगवान शिवने त्यांच्याकडून सिद्धी प्राप्त केली होती आणि त्यांच्या करुणेमुळे त्यांचे अर्धे शरीर देवीचे झाले.
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते, नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी संपर्क ठेवते. तिच्या तेजाज्ञा या फॅशन ब्रॅण्डमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिने आजवर अगं बाई अरेच्चा!, मी सिंधुताई सपकाळ, वावटळ, रानभूल, टार्गेट, गैर, पकडापकडी, ब्लफमास्टर, मुक्ती, एक तारा, तू हि रे अशा सिनेमांमधून दमदार अभिनय केलं असून एकाच ह्या जन्मी जणू, तुझं नि माझं घर श्रीमंताचं, लज्जा, कालाय तस्मै नम:, १०० डेझ अशा मालिकांमधून तिने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तेजस्विनीने यावर्षी बिझी शेड्युलमुळे नवरात्रीची संकल्पना शक्य झाली नसल्याची दिलगिरी व्यक्त केली असली तरीही शक्य तितक्या लवकर नवकल्पनेने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करावे अशी सर्वांची मनोमन इच्छा आहे..