मराठी बिग बॉसच्या घरात आता मोजकेच स्पर्धक उरले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एकट्या राखी सावंतने ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलली आहे असेच चित्र सध्यातरी दिसत आहे. बिग बॉसच्या घरात आवाज चढवणारी अपूर्वा देखील आता बरीचशी शांत झालेली आहे. खरं तर तेजस्विनी लोणारीच्या जाण्यानेच बिग बॉसच्या घरात चार चॅलेंजर्स बोलावण्यात आले होते. विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ यांनी या घरात एक आठवडा राहून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर राखीमुळे शोचा टीआरपी वाढल्याचे पाहून तिला आणखी काही दिवस घरात ठेवण्यात आले.
मात्र घरातील कोणताच सदस्य उत्साही नसल्याचे पाहून बिग बॉसने कोणाला भरती केलंय? अशी प्रतिक्रिया राखीने दिली होती. खरं तर तेजस्विनी लोणारी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची विनर असावी, असा कौल बऱ्याचशा प्रेक्षकांनी दिला होता. मात्र टास्क दरम्यान हाताला दुखापत झाल्यामुळे तिला बिग बॉसच्या आदेशानुसार नाईलाजाने घरातून बाहेर पडावे लागले. तेजस्विनीने पुन्हा बिग बॉसमध्ये यावे अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येऊ लागली. ती घरात पुन्हा येणार की नाही याबाबत अजूनही खात्रीशीर मात्र माहिती दिली गेलेली नाही. स्वतः तेजस्विनीने देखील ही इच्छा व्यक्त केली होती, परंतु मी निर्माती म्हणून तुमच्या भेटीला येणार आहे. अशी घोषणा तिने यावेळी केलेली दिसली.
तेजस्विनीच्या बोटाला जबरदस्त दुखापत झाल्यावर चाहत्यांनी चिंता व्यक्त करत, शस्त्रक्रिया करण्यात आली असे बोलण्यात येत आहे. याबाबत तेजस्विनी खुलासा करत म्हणते की, माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो तुम्ही खूप मजेत असाल अशी मी अपेक्षा करते. माझ्या तब्येतीची विचारपूस करणारे अनेक संदेश मला तुमच्याकडून मिळाले. माझ्या बोटाची शस्त्रक्रिया झाल्याचा गैरसमज अनेकांना होत असल्याचे मला समजले. मुळात, तसं काहीही झालं नाही. माझ्या हाताला किरकोळ फ्रॅक्चर झाले असून, ते काही आठवड्यात भरून निघेल. त्यामुळे शस्त्रक्रियेची गरज नाही असे माझ्या डॉक्टरांनी सांगितले. आता तीन आठवडे झाले असून बऱ्यापैकी सुधारणा देखील होत आहे. लवकरच एकदम तेजस्वी तेजस्विनी तुम्हाला परत एकदा दिसून येईल. तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच राहू द्या.