Breaking News
Home / बॉलिवूड / शस्त्रक्रिया करून चेहरा बिघडल्यामुळे या अभिनेत्री आहेत बेरोजगार, इंडस्ट्रीत एकही चित्रपट मिळत नाही…
angelina sahar after surgery
angelina sahar after surgery

शस्त्रक्रिया करून चेहरा बिघडल्यामुळे या अभिनेत्री आहेत बेरोजगार, इंडस्ट्रीत एकही चित्रपट मिळत नाही…

मित्रहो सौंदर्य हा स्रीचा अनमोल दागिना आहे, नेहमीच सुंदर दिसावे असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. समाजात आपण सर्वात जास्त रूपवान असावे यासाठी साज शृंगार करते पण बॉलिवूड अभिनेत्री मात्र अभिनय क्षेत्राची गरज म्हणून आपल्या सौंदर्याला सतत नवनवीन गोष्टींनी, नवीन पेहरावाने खुलवत असतात. अभिनेत्री म्हणजे जणू अनेक चाहत्यांची स्वप्न परी असते आणि ती कायम स्मरणात रहावी यासाठी तत्पर असते.

योगा, जिम, एरोबिक्स, झुंबा यासारखे शरीर मेहनतीचे प्रकार करून बऱ्याच जणी स्वतःला खुलवतात तर कोणी घरगुती उपाय करून सौंदर्यात भर घालत असते. पण यातील शॉर्टकट उपाय म्हणून काही अभिनेत्री अविश्वासू सौंदर्य प्रसाधने आणि अक्षरशः प्लास्टिक सर्जरी देखील करतात, असे केल्याने बऱ्याच जणी आपले नैसर्गिक सौंदर्याला मुकतात. सौंदर्य खुलवण्याच्या स्पर्धेत प्लास्टिक सर्जरी करून आहे तो चेहरा सुद्धा पूर्णपणे बिघडवून ठेवला अशा काही अभिनेत्रींची आज आपण माहिती घेणार आहोत. आज त्यांना नवीन चित्रपट किंवा टेलिव्हिजन मालिका मिळणे देखील कठीण झाले आहे. तर मित्रहो हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून आपणाला त्या अभिनेत्री कोण कोण आहेत व प्लास्टिक सर्जरी केल्यावर त्या आज कशा दिसतात हे कळेल.

राखी सावंत ही अभिनेत्री बॉलिवूड मध्ये आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे, तीने अनेक चित्रपटात आपल्या नृत्याने धिंगाणा घातला आहे. भावपूर्ण नृत्य अभिनयामुळे ती भरपूर लोकांना आवडत होती, अनेक जण तिच्या नृत्याचे चाहते आहेत. पण आपले आणखी चाहते वाढावे, आपण आणखीन सुंदर दिसावे यासाठी तिने आपल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली. अन ती अयशस्वी झाली, तीचे सौंदर्य खुलण्याऐवजी बिघडून गेले. या सर्जरीमध्ये तिच्या ओठांचा आकार जास्त वाढला होता त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या तिला खालच्या पातळीतील अनेक कमेंट आल्या होत्या. एकाने तर कळसच केला, तीला प्लास्टिकचे दुकान देखील म्हटले होते. हे कोणत्याही कलाकारासाठी खूपच वाईट आहे, चेहऱ्यातील अनपेक्षित बदलामुळे आता तीला चित्रपट मिळणे कठीण झाले आहे.

raakhi sawant
raakhi sawant

अभिनेत्री कोयना मित्रा ही आपल्या नॅचरल अभिनय आणि बोल्ड रुपासाठी खूप चर्चेत असायची, लाखो लोक तीचेही चाहते होते. पण जेव्हापासून तीने प्लास्टिक सर्जरी केली आहे तिच्या सौंदर्यात कमालीची घट झाली आहे. हल्ली ती चित्रपट सृष्टीत फार कमी दिसते, तीने आपल्या नाक आणि ओठांवर सर्जरी केली होती पण ती अयशस्वी झाली. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर तीचा चेहरा खराब झाला असून तीला चित्रपटांचे ऑफर येणे बंद झाले आहे. बीग बॉस १३ मध्ये जेव्हा जेव्हा ती सामील झाली होती तेव्हा तीने स्वतः सर्जरी बद्दल मान्य केले होते. यासर्वांचा वाईट परिणाम तिच्या करिअर वर झाला असून या गोष्टीचा खेदही तिने नोंदविला होता.

koena mitra
koena mitra

अभिनेत्री श्रुती हसन हीने आपल्या सुंदरतेने अनेकांना आकर्षित केले आहे, विविध भाषांतील चित्रपटांमुळे तिचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे. अनेक चित्रपटात तीने छान अभिनय केला आहे. ती अभिनेत्री सह उत्तम गायिका देखील आहे, बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये तिने आपल्या गाण्याचे प्रदर्शन केले आहे. ती दिसायला मुळातच सुंदर असली तरी तीने देखील आपल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली आहे. तीने नाकाची Rhino शस्त्रक्रिया केली असून या शस्त्रक्रियेमुळे तिच्या चेहऱ्यात आपणाला चांगला बदल दिसून येतो. तीने स्वतः मुलाखतीमध्ये याबद्दल मान्यता दिली आहे.

shruti hassan
shruti hassan

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना हिला आज कोण नाही ओळखत, अनेकांसाठी ती स्वप्नपरी आहे. अँजेलिना सारखे दिसण्यासाठी सोशल मीडियावर वर नेहमी सक्रिय असणाऱ्या सहार ने एकूण ५० वेळा शस्त्रक्रिया केली आहे. पण एवढ्या शस्त्रक्रिया करून देखील ती अँजेलिना सारखी मुळीच दिसत नव्हती. खूप साऱ्या शस्त्रक्रियांच्या साईड इफेक्टमुळे तिचा चेहरा खूपच विद्रुप बनला आहे, सोशल मीडियावर तीने काही फोटो पोस्ट केले असून अनेक जणांनी या फोटोवर ट्रोल केले आहे. काही जणांनी तीला झोम्बी भूत अशाही कमेंट दिल्या आहेत. तिच्या या विद्रुप रूप प्रदर्शनामुळे तिला १० वर्षांची सजा देखील झाली असल्याचे चर्चेत आहे. आपण तीचे हे काही फोटो पाहू शकतो ज्यामध्ये सर्जरीचा तिच्या चेहऱ्यावर झालेला परिणाम दिसून येतो.

sahar tabar angelina fan
sahar tabar angelina fan

बॉलिवूड मधील टार्जन गर्ल आयशा टाकीया आझमी ही तिच्या सौंदर्यासाठी खास पसंत केली जाते, तीचा अभिनय देखील लोकांना खूप आवडतो. पण आपल्या सौंदर्यात वाढ करण्यासाठी तीने सुद्धा प्लास्टिक सर्जरी केली आहे. या सर्जरी मुळे तीचा चेहरा सुंदर बनण्याऐवजी खूप खराब दिसू लागला आहे. तीने आपल्या ओठांची सर्जरी केली होती पण तीचे ओठ खूप जाडसर बनले आहेत त्यामुळे तिच्या सौंदर्यात कमालीची घट झाली आहे. आता ती चित्रपट सृष्टीत देखील जास्त दिसत नाही, नवीन चित्रपट मिळणे कमी झाले असून तीचे करिअर देखील धोक्यात आले आहे.

ayesha takia azmi
ayesha takia azmi

आपल्याला रूपवान सौंदर्याने रसिक प्रेक्षकांना भुरळ घालावी, जास्तीत जास्त लोकांनी पसंत करावे, अनेक चित्रपटात काम करण्यास मिळावे अशी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. सौंदर्यात भर घालण्यासाठी त्या नाना प्रकारच्या गोष्टी अवलंबतात, सतत काही न काही प्रयोग करत राहतात. बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री लाखो रुपये खर्च करून सुंदर दिसण्याच्या शर्यतीत सर्जरी द्वारे यशस्वी देखील होतात पण ज्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले आहेत ते स्वतःचे रूप आणि करिअर या दोहोंनाही कायमचे मुकतात, हे खूपच दुःखद आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.