सुंदरा मनामध्ये भरली ह्या कलर्स मराठीवरील मालिकेत नुकतेच एक धक्कादायक वळण पाहायला मिळाले. अभिमन्यू आणि लतिका पुन्हा एकदा लग्न करून एकत्र आले आहेत. परंतु लग्नाहून परतत असताना त्यांना मोठा धक्का बसला आहे. या काळात दौलतने जहागिरदारांचे घर आणि जमिनीवर ताबा मिळवला. ही सर्व मालमत्ता पुन्हा मिळवण्यासाठी अभ्या आणि लतिका यांनी प्रयत्न सुरू केले आहेत त्यात त्यांना नंदिनी देखील मदत करताना दिसत आहे. दौलतसोबत लग्न करण्यासाठी नंदिनीने त्याला तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे. नंदिनीसोबत लग्न करण्यासाठी मी काहीही करेल असे दौलत त्याच्या आबांना म्हणत असतो. त्यामुळे आपलं घर पुन्हा मिळवण्यासाठी अभिमन्यू आणी लतीकाला नंदिनी कशा पद्धतीने मदत करते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दरम्यान मालिकेत एवढे दिवस खलनायिका निभावणारी मिस नाशिक हिची मालिकेतून एक्झिट झाली आहे. अर्थात दौलतने मिस नाशिकला आपल्या आयुष्यातून दूर निघून जाण्यास सांगितले आहे. या दोघांनी मिळून लतिका आणि अभिमन्यूला खूप त्रास दिला होता मात्र आता मिस नाशिक हे पात्र मालिकेतून एक्झिट घेत असल्याचे दिसून येते. मिस नाशिक हे खलनायकी ढंगाचे पात्र अभिनेत्री पूजा पुरंदरे हिने आपल्या अभिनयातून सुरेख रंगवले होते. तिच्या विरोधी भूमिकेचा प्रेक्षकांना प्रचंड राग यायचा मात्र आता ती मालिकेत दिसणार नसल्याने तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूजा पुरंदरे ही मालिकेतून एक्झिट घेत असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात ती म्हणते की, “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेतून मी निरोप घेतला आहे. कामिनी उर्फ मिस नाशिक हे पात्र साकारताना..

खूप मजा आली, तुम्हा सर्वांकडून या पत्राला खूप प्रेम मिळालं. सुंदरा च्या सगळ्या टीम बरोबर हा प्रवास मस्त झाला. चॅनल, निर्मिती संस्था, लेखिका, दिग्दर्शक, सहकलाकार, टेक्निकल टीम अणि प्रेक्षक सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा लवकरच भेटू.’ पूजाने लिहिलेल्या ह्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. आता यापुढे पूजा मालिकेत दिसणार नसल्याने तिचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. पण मी लवकरच आणखी एका नव्या भूमिकेत येईल अशीही आशा तिने व्यक्त केली आहे. पूजा पुरंदरे हिच्या अगोदर मालिकेतील हेमाचे पात्र बदलण्यात आले होते त्यामुळे देखील मालिकेचे प्रेक्षक नाराज झाले होते खानायिकेचे पात्र मालिकेतून इतके प्रभावीपणे साकारल्यानंतर ह्या अभिनेत्री प्रेक्षकांची दाद मिळवत होते मात्र असे अचानक झालेले बदल प्रेक्षकांची नाराजी वाढवणारे नक्कीच ठरले आहेत.

पूजाने देखील मिस नाशिक म्हणून या मालिकेमुळे स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यामुळे ही भूमिका तिच्यासाठी खूपच महत्वपूर्ण होती मात्र मालिकेच्या कथानकात आलेल्या ट्विस्टमुळे हे पात्र पुन्हा मालिकेत दिसणार नाही. पूजाने या मालिकेअगोदर नकुशी, देवयानी, लक्ष्य, किती सांगायचंय मला, देवयानी अशा मालिकेतून काम केलं आहे. बहुतेकदा मालिकेतून तिच्या वाट्याला विरोधी भूमिका आलेल्या पाहायला मिळतात. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील तिने साकारलेली कामिनी प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्याचमुळे तिची अचानक झालेली एक्झिट प्रेक्षकांना देखील रुचणार नाही. लवकरच पूजा एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांसमोर यावी हीच एक सदिच्छा.