सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुंदर आमचे घर’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सासू सून नणंद यामच्यामधील भांडणांना आणि कटकारस्थानाला बगल देत, प्रेमळ सासू सुनेचे आई मुली सारखे नाते यात पहायला मिळत आहे. अभिनेत्री संचिता कुलकर्णी काव्याची भूमिका साकारत असून रितेशची भूमिका संचित चौधरी याने निभावली आहे. आईजींची भूमिका उषा नाडकर्णी यांनी साकारली असून त्यांची भूमिका सुनांवर धाक दाखवणारी आहे. सुकन्या कुलकर्णी यांनी या मालिकेतून सुभद्राची भूमिका आपल्या अभिनयाने चोख बजावली आहे.
त्यांच्यासोबत प्रसाद पंडित, दीपक आलेगांवकर, ओम जंगम, विजय पटवर्धन, वेदश्री दळी, संयोगिता भावे, दीपक ठाकरे या जाणत्या कलाकारांची साथ मालिकेला लाभली आहे. मालिकेत प्रणालीची सोज्वळ भूमिका अभिनेत्री वेदश्री दळी हिने निभावली आहे. आईजींच्या कचाट्यातून सुभद्राकाकुला वाचवण्यासाठी ही प्रणाली नेहमीच पुढाकार घेताना दिसते. वेदश्री दळी हिने तिच्या सुंदर अभिनयाने प्रणालीची भूमिका सुरेख वठवली आहे. वेदश्री दळी ही मालिका चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. झी मराठीवरील मालिका स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवार बाईंची भूमिका वेदश्रीने निभावली होती. अरे सोडा बाई बाटली या चित्रपटात देखील वेदश्रीने अभिनय साकारला होता.
कलर्स मराठीवरील श्री स्वामी समर्थ या मालिकेत मालोजीराजेंच्या पत्नीची भूमिका तिने साकारली होती. वेदश्री दळीची लेक देखील मराठी सृष्टीतील प्रसिद्ध बालकलाकार म्हणून नावारूपाला आली आहे. स्पृहा दळी हे तिच्या लेकीचं नाव. रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेत ती दीपिकाची भूमिका साकारत आहे. स्पृहाची बालकलाकार म्हणून असलेली ही पहिलीच मराठी मालिका आहे. या भूमिकेमुळे स्पृहा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. मालिकेत लवकरच दीपिका आणि कार्तिकीला आपले आईबाबा कोण आहेत याचा उलगडा होणार आहे. दीपिका घर सोडून कार्तिकीच्या घरी राहायला जाते तिथेच सौंदर्या कार्तिकीला आपल्या घरी घेऊन जाते.
श्वेता ही आपल्या आईची बहीण आहे हे ती श्वेताच्या बोलण्यावरून कार्तिकी ओळखते. याचा उलगडा होण्यासाठी ती आज्जीला याबाबत प्रश्न विचारते. आपले बाबा कोण? श्वेता माझी मावशी आहे का? या प्रश्नांची उत्तरं सौंदर्या कशी देणार याचा उलगडा मालिकेतून लवकरच होणार आहे. त्यामुळे दीपिका आणि कार्तिकीला त्यांच्या आई बाबांबद्दलचे सत्य लवकरच समजणार असल्याची चिन्ह मालिकेतून पाहायला मिळत आहेत.