मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री सृहा जोशी हिने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. अभिनयासोबतच स्पृहा उत्तम कवयित्री देखील आहे. ‘नवंकोरं’ या नवीन आणि उत्स्फूर्त कवितांच्या कार्यक्रमात ती सध्या व्यस्त आहे. स्पृहा तिच्या खाजगी आयुष्याबद्दल खूप कमी बोलताना दिसली आहे. परंतु प्रथमच तिने आपल्या नवऱ्यासोबत म्हणजेच वरद लघाटेसोबत एक मुलाखत दिलेली पाहायला मिळाली. यात तिने दोघांच्या सुरुवातीच्या भेटीच्या अनेक आठवणींना उजाळा दिलेला आहे. स्पृहाने पदवीच्या शिक्षणासाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले त्यावेळी वरद शेवटच्या वर्षात शिकत होता. एका कॅम्पस फूडसाठी कॉलेज रीपोर्टर्स म्हणून या दोघांनी टीममध्ये सहभाग घेतला होता.

वरद सिनिअर असल्याने अभ्यासाच्या नावाखाली त्याने या कॅम्पस फूडच्या टीममधून ब्रेक घेतला होता. त्यावेळी स्पृहाने ही टीम सांभाळण्याची जबाबदारी घेतली. त्याअगोदर वरद ही टीम सांभाळायचा. परंतु एक दिवस तो अचानक या टीममध्ये आला आणि बॉस म्हणून या टीमच्या डोक्यावर बसला. स्पृहाला सगळ्या स्टोरीज त्याच्याकडून अप्रूव्ह करून घ्यायला लागायच्या. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला विचारावे लागायचे हे स्पृहाला मुळीच मान्य नव्हते त्यामुळे तो तिला अजिबात आवडायचा नाही. कारण वरद इंग्रजी माध्यमातून शिकलेला त्याचं लिखित मराठी फार चांगलं नव्हतं. त्याचं हस्ताक्षर सुद्धा चांगलं नव्हतं आणि मुख्य म्हणजे तो त्याचे आर्टिकल्स त्याच्या वडिलांकडून उतरवून घ्यायचा. त्यामुळे ज्या माणसाला स्वतःचे आर्टिकल्स स्वतः लिहिता येत नाहीत, तो मला का सांगणार मी कसं लिहायचं ते?

एकीकडे स्पृहाने वरदबद्दल हा समज करून घेतला होता. त्याचवेळी वरदने देखील स्पृहाबद्दल असा समज करून घेतला होता, की ही या कॅम्पेन मध्ये कुणाच्या तरी वशील्याने आली आहे. स्पृहा त्यावेळी मराठी सृष्टीत बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळवत होती, मात्र वरद तिच्या या सर्व बाबतीत अनभिज्ञ होता. या कॅम्पेनसाठी पाच कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांसमोर सूत्रसंचालन करायचे होते. त्यावेळी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून संवाद साधावा म्हणून स्पृहाचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र स्पृहा हे करू शकेल यावर वरदला बिलकुल विश्वास नव्हता. पहिल्या इव्हेंटसाठी स्पृहाने सूत्रसंचालन केले तेव्हा वरदला स्पृहाबद्दल विश्वास वाटू लागला. त्यानंतर दोघांची पुढे चांगली मैत्री झाली आणि गप्पा मारता मारता ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
स्पृहा आणि वरद जितके एकमेकांना समजून घेतात तितकेच हे दोघे एकमेकांशी भयंकर भांडतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते जगात कुठे युद्ध सुरू असेल, तेवढ्या लेव्हल पर्यंत आमच्या घरी भांडण झालेलं असतं असे ते म्हणतात. आम्ही दोघे भिन्न स्वभावाच्या व्यक्ती आहोत असे स्पृहा स्पष्टीकरण देते. वरदला अभिनय क्षेत्र फारसे आवडत नव्हते त्यामुळे जर ऍक्टिंग करणार नसशील तर आपण लग्न करू असे म्हटले होते. लग्नाअगोदर हे दोघे ५ वर्षे एकमेकांना डेट करत होते. घरच्यांनी पुढाकार घेऊन किमान साखरपुडा तरी करावा अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. त्यामुळे लगेचच त्यांचा साखरपुडा पार पडला आणि एक ते दीड वर्षानंतर लग्न केले. पण या मधल्या भेटीत आम्हाला लग्नाव्यतिरिक्त आयुष्यात काहीतरी करायचंय हे अगोदरच ठरलेलं होतं. त्यामुळे प्रत्येक भेटीत त्यांच्या प्रेमीयुगुला सारख्या गुलगलू गप्पा वगैरे कधीच होत नव्हत्या असे स्पृहा म्हणते.