Breaking News
Home / मालिका / जयदीप नव्हे तर गौरीच आहे माई दादांची मुलगी.. अम्माचा धक्कादायक खुलासा

जयदीप नव्हे तर गौरीच आहे माई दादांची मुलगी.. अम्माचा धक्कादायक खुलासा

स्टार प्रवाहवरील बहुतेक सर्वच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही त्यातलीच एक मालिका. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याचमुळे टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेने सुरुवातीपासूनच पहिल्या पाचच्या यादीत आपले स्थान निश्चित केले. मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या आयुष्यात अनेक संकटं आली. शालिनी आणि देवकीच्या कटकारस्थानापुढे वेळप्रसंगी तीला वेगळे रूपही धारण करावे लागले. खोटा जयदीप समोर येण्यासाठी गौरीने अनेक प्रयत्न केले. यातूनच आता मालिकेत धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे.

girija prabhu asha dnyate
girija prabhu asha dnyate

मालिकेत साधीसुधी गौरी ही अम्माची मुलगी आहे असेच या कथानकात दाखवले होते. मात्र आता अम्मानेच गौरी माई दादांची मुलगी असल्याचे उघड केले आहे. रंगनाथरावानी अम्माला मरता मरता काहीतरी सांगितलेले असते हे शालिनी जयदीपला सांगते. तेव्हा जयदीप अम्माला याबाबत विचारतो. तेव्हा अम्मा धक्कादायक खुलासा करताना म्हणते की, जयदीप हा तुमचा मुलगा नसतो तो सुर्या दादाचा मुलगा असतो. पण हे बी खरं आहे की गौरी माई दादांची मुलगी असते. अम्माच्या या खुलास्यावर शिर्के पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसतो. जयदीप हा माई दादांचा मुलगा नाही तर गौरीच आपली मुलगी आहे.

girija prabhu mandar jadhav
girija prabhu mandar jadhav

हे आता मालिकेतून लवकरच उलगडताना दिसणार आहे. त्यामुळे ही मालिका आता एका नवीन वळणावर येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत गौरीची भूमिका गिरीजा प्रभू हिने तिच्या अभिनयाने उत्तम निभावली आहे. तर जयदीपची भूमिका मंदार जाधव याने समर्थपणे पेलली आहे. गौरी ही शिर्के पाटलांची मुलगी आहे. आजवर तिच्यावर मोठा अन्याय झालाय म्हणून जयदीप आता कोणती भूमिका घेणार हे मालिकेतून पाहायला मिळेल. त्यामुळे हा रंजक ट्रॅक पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील हे वेगळे सांगायला नको.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.