बिग बॉसच्या आजच्या भागात घरातून बाहेर पडलेल्या सदस्यांनी पुन्हा घरात एन्ट्री घेतलेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या भागाची आतुरता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली आहे. विशेष म्हणजे कालच्या एपिसोडमधून कोणताच सदस्य एलिमीनेट करण्यात आला नाही. मिरा आणि गायत्री या दोघींमधुन काल मिराला एलिमीनेट करण्यात आलं होतं. परंतु एक आश्चर्याचा धक्का देत महेश मांजरेकर यांनी कोणीच घराबाहेर जाणार नसल्याच सांगितलं.

आपण एलिमिनेट झाल्यापासून वाचलो, हे पाहून मिरा रडता रडता मात्र पुन्हा हसायला लागली होती. त्यामुळे ह्या आठवड्यात ८ ही सदस्य टिकून राहिलेले पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरात एकीकडे एलिमीनेशन रद्द केले मात्र दुसरीकडे तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य यांनी रिएंट्री केलेली पाहायला मिळणार आहे. स्नेहा वाघने घरात एन्ट्री करताच आपल्याच मित्रांना टार्गेट केलेले पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरातील हा ट्विस्ट नेमका काय धमाल घडवून आणणार याची उत्सुकता आहे. अर्थात हे सदस्य बाहेरून आल्याने सर्व काही अभ्यास करून आले आहेत आणि त्यामुळे कोणता सदस्य खरा खेळतो याचा उलगडा आजच्या भागात झालेला दिसणार आहे. बिग बॉसच्या आदेशानुसार घरातील सदस्य आहे त्या स्थितीत स्थिर राहणार आहेत आणि त्यांना भेटायला स्नेहा, तृप्ती आणि आदिश यांनी हजेरी लावली आहे. त्यावेळी स्नेहा आपल्या मित्रांना म्हणते की, आपलेच मित्र आपल्या मागून आपली इज्जत काढतात.. तिचे हे खोचक बोलणे कोणाच्या विरोधात असणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल पण तूर्तास या सदस्यांनी मात्र घरात पुरता राडा घातलेला पाहायला मिळतो आहे.

बिग बॉसच्या घरात असताना स्नेहाची जयसोबत खूप चांगली मैत्री जुळून आली होती. त्यामुळे जयला ती कोणता सल्ला देणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. दरम्यान अ टीममध्ये आता चांगलीच फूट पडलेली दिसत आहे. गायत्रीच्या विरोधात जयने एक वक्तव्य केलं होतं की, गायत्री पेक्षा आपण विशालमध्ये इन्व्हेस्ट करायला हवी होती. त्याच्या या वक्तव्यावर गायत्री नाराज झाली आहे. तसेच मिराच्या बाबतीत देखील तीच मत आता विरोधात जाऊ लागलं असल्याने मीरा आणि जय पासून ती चार हात लांब राहिलेली पाहायला मिळत आहे. मैत्रीत पडलेली ही फूट स्नेहा भरून काढेल का की आणखी काही वेगळे पाहायला मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.