Breaking News
Home / मराठी तडका / सिध्दार्थचा नवीन लूक पाहिलात का.. मिळतायेत आश्चर्यकारक प्रतिक्रिया
ranveer singh siddharth jadhav
ranveer singh siddharth jadhav

सिध्दार्थचा नवीन लूक पाहिलात का.. मिळतायेत आश्चर्यकारक प्रतिक्रिया

मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केलेला सिद्धार्थ जाधव आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. मराठी चित्रपटाचा नायक ते हिंदी चित्रपटातील नायकाचा मित्र अशा भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्याचा कलासृष्टीतला एकंदरीतच वावर हा खरोखर वाखाणण्याजोगा ठरला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे तो सूत्रसंचालन करतो, तेव्हा त्यातून प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेताना दिसतो. त्याच्या प्रत्येक कृतीतून तो किती जमिनीवर पाय ठेवून आहे याची प्रचिती देखील प्रत्ययास येते. सिद्धार्थ दिसला की प्रेक्षकांकडून आपला सिद्धू अशी आपसूकच हाक दिली जाते. सिद्धार्थ आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

siddharth jadhav new look
siddharth jadhav new look

नुकताच सिध्दार्थने त्याचा लूक बदलला आहे. एका आगळ्या वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये सायली संजीवने काढलेला त्याचा एक फोटो सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सिद्धूची ही हटके स्टाईल पाहून तो मराठी सृष्टीतला स्टाईल आयकॉन म्हणून रणवीर सिंगची बरोबरी करू पाहत आहे. रणवीर सिंग हा बॉलिवूड सृष्टीतील स्टाईल आयकॉन म्हणून ओळखला जातो. त्याच्या संपर्कात राहून सिद्धू देखील मराठीतला स्टाईल आयकॉन म्हणून घोषित करण्यात आला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत काम केल्यानंतर रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी सोबत सिद्धार्थची छान मैत्री जुळली आहे. रोहित शेट्टीच्या अलीकडच्या चित्रपटात सिद्धूला भूमिका ठरलेली असते हे सर्वश्रुत आहे. रणवीर सिंग चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी हटके स्टाईल करतो.

ranveer singh siddharth jadhav
ranveer singh siddharth jadhav

रणवीरचे गुण घेऊन सिद्धार्थ सुद्धा स्वतःची ओळख बनवू पाहत आहे. सिध्दार्थच्या या नव्या लूकमुळे चर्चेत आला असून त्याला लोकांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. अनेकांनी त्याच्या लुकचं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही चाहत्यांना मात्र सिध्दार्थचा लूक पटलेला नसल्याचे दिसून येते. रणवीर सिंगचं पाणी लागलं असं म्हणून त्याच्या नव्या लुकवर खिल्ली उडवली जात आहे. पण बहुतेकांकडून त्याचा नवीन लूक आवडला असल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. लोच्या झाला रे या नाटकामुळे सिध्दार्थचे नशीब पालटले होते. हे नाटक त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. लुक्स डजंट मॅटर असे म्हणत प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयावर प्रेम दाखवलं आहे. म्हणून तो यशाची एकएक पायरी पुढे चढताना पाहायला मिळतो.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.