Breaking News
Home / जरा हटके / तसं जर त्याच्यात असेल तर मी आत्ता लग्नाला तयार आहे.. सायली संजीवला हवाय असा जोडीदार
actress sayali sanjeev
actress sayali sanjeev

तसं जर त्याच्यात असेल तर मी आत्ता लग्नाला तयार आहे.. सायली संजीवला हवाय असा जोडीदार

झिम्मा चित्रपटाच्या यशानंतर हेमंत ढोमे झिम्मा २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यावेळी झिम्मा २ मध्ये रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे  देखील झळकणार असल्याने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. तर सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, क्षिती जोग हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. झिम्मा २ चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार मंडळींनी जोरदार प्रमोशनसाठी कंबर कसली आहे.

sayali sanjeev father
sayali sanjeev father

नुकतेच सायली संजीवनेही एका मुलाखतीतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सायली संजीव ही तिच्या वडिलांच्या खूपच क्लोज होती. वडिलांच्या निधनाने खचलेल्या सायलीने आपला जोडीदार सुद्धा वडीलांसारखाच प्रेम करणारा असावा असे या मुलाखतीत म्हटले आहे. ती म्हणते की, बॉयफ्रेंड आणि नवऱ्यामध्ये आपण आपल्या वडिलांना बघत असतो ही बेसिक गोष्ट आहे. कारण त्या व्यक्ती इतकं प्रेम आपण दुसऱ्या कोणावर नाही करू शकत. त्यामुळे तसंच आणि ती इमेज आपण आपल्या लाईफ पार्टनरमध्ये बघत असतो. आपण आपल्या आयुष्यातले २०, ३० वर्ष त्या व्यक्तीबरोबर घालवलेले असतात. त्यामुळे त्याच्यावर आपण प्रेम करत असतो. आपले वडील जितकं प्रेम आपल्यावर करतात तितकं प्रेम जर नवऱ्याने केलं ना तर सर्व सॉरटेड आहे.

sayali sanjeev parents
sayali sanjeev parents

माझ्या वडिलांनी जितकं निस्वार्थी खरं आणि सच्च प्रेम केलं ते असेल तर मी आत्ता लग्नाला तयार आहे, असे सायली संजीव दिलखुलासपणे सांगते. दरम्यान ऋतुराज गायकवाडसोबत सायली संजीवचे नाव जोडले जात होते. क्रिकेटप्रेमी तर तिला वहिनी म्हणूनच संबोधत होते. ऋतुराज आणि सायली संजीव मध्ये काहीतरी आहे अशी बरीच चर्चा रंगली होती. पण ऋतुराजने उत्कर्षा पवार सोबत लग्न केले आणि त्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सायली अजूनही सिंगलच आहे पण तिला तिच्या वडिलांसारखे खरेपणाने, निस्सीम प्रेम करणार नवरा हवाय हे ती आपल्या बोलण्यातून उलगडते. आणि त्याच्याशी लग्न करायला मी आत्ताही तयार आहे असे ती या मुलाखतीत म्हणते.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.