सरसेनापती हंबीरराव हा ऐतिहासिक चित्रपट २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कर्नाटकात या चित्रपटाचे स्वागत दुग्धाभिषेक घालून करण्यात आलेले पाहायला मिळाले. मराठी चित्रपट सृष्टीतला हा एक बिग बजेट सिनेमा आहे असे बोलले जाते त्याचमुळे या चित्रपटाची भव्यता दिसून येते. या चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात हंबीररावांसाठी जी घोडी वापरण्यात आली आहे. त्या घोडीला कलाकारांप्रेक्षाही सर्वाधिक मानधन दिलेले आहे कारण ही एक सेलिब्रिटी घोडी आहे. तानाजी या बॉलिवूड चित्रपटात अजय देवगणने याच घोडीवर बसून चित्रीकरण केले होते. या घोडीला सरसेनापती हंबीरराव चित्रपटासाठी मुंबईहून आणावे लागायचे.
एसी ट्रकमधून शूटिंगच्या ठिकाणी आणून तिच्या रोजच्या आहाराचा महागडा खर्च करावा लागायचा. या घोडीला दिग्दर्शकाने रोल, साउंड ऍक्शन आणि कट असे म्हटले की लगेच काय करायचे ते समजायचे. त्यामुळे निर्मात्यांनीही घोडीवर निर्धास्तपणे खर्च केलेला पाहायला मिळाला. प्रवीण तरडे यांनी निभावलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंची भूमिका चपखल साकारली आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत गश्मीर महाजनी झळकला आहे. स्नेहल तरडे, रमेश परदेशी, शुभंकर एकबोटे, राकेश बापट, श्रुती मराठे या कलाकारांनी भूमिका चोख बजावल्या आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांची गर्दी खेचून आणत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
शुक्रवारी २.६ कोटी, शनिवारी २.८ कोटी तर तिसऱ्या दिवशी ३.३१ कोटींपर्यंत मजल मारत अवघ्या तीन दिवसात ८.७१ करोडोंचे कलेक्शन जमवले आहे. काल सोमवारी चौथ्या दिवशी या चित्रपटाने १.८ करोडचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या चार दिवसात चित्रपटाने १०.५१ कोटींचे कलेक्शन जमवलेले आहे. चित्रपटाची ही रेकॉर्डब्रेक कमाई प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवताना दिसत आहे. चित्रपट पाहून आल्यावर एका व्यवसायिकाने अर्धा डझन मोफत आंब्याची ऑफर देऊ केली होती. तिकीट दाखविणाऱ्या प्रेक्षकास फ्रेश ग्रीनी यांच्याकडून अर्धा डझन आंबे मोफत मिळणार होते. खर तर हा चित्रपट पाहिला जावा म्हणून अशा ऑफरच्या माध्यमातून प्रेक्षकांनीच पुढाकार घेतला होता.