Breaking News
Home / मालिका / सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या निवड प्रक्रियेवर प्रेक्षकांची नाराजी.. विजेत्या स्पर्धकाला मिळाली एवढी रक्कम
gauri gosavi winner lil champs 2021
gauri gosavi winner lil champs 2021

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या निवड प्रक्रियेवर प्रेक्षकांची नाराजी.. विजेत्या स्पर्धकाला मिळाली एवढी रक्कम

सारेगमप लिटिल चॅम्पस या शोचा महाअंतिम सोहळा काल रविवारी ५ डिसेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यात अनु कपूर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. त्यात आणखी एक बाब म्हणजे सुदेश भोसले आणि त्यांचा मुलगा सिद्धांत भोसले यांनी देखील हजेरी लावली, आणि या दोघांनी गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केलं होतं. यासोबतच मकरंद अनासपुरे, स्नेहलता वसईकर, अंशुमन विचारे, अदिती सारंगधर यांनी त्यांच्या चिमुकल्यासोबत सारेगमपच्या मंचावर हजेरी लावली होती. तर स्वानंदी बेर्डे आणि अभिनय बेर्डे हे देखील तेथे उपस्थित होते.

sudesh bhosale annu kapoor
sudesh bhosale annu kapoor

महाअंतिम सोहळ्यात टॉपचे ५ स्पर्धक म्हणून पलाक्षी दीक्षित, गौरी गोसावी, ओंकार कानिटकर,  स्वरा जोशी आणि सारंग भालके यांनी बाजी मारली होती. गौरी गोसावि ही या शोची विजेती ठरली आहे. तिला १ लाखांचं नॅशनल सेविंग सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. तर ओंकार कानेटकर आणि सारंग भालके हे उपविजेते ठरले आहेत. उपविजेते ठरलेले ओंकार आणि सारंग या दोन्ही स्पर्धकांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. तर या शोमध्ये सेकंड रनर अप स्वरा जोशी ठरली आहे. महाअंतिम फेरीत मुंबईच्या गौरी  गोसावीने बाजी मारली आहे. ती एक उत्कृष्ट गायिका असल्याचे स्वतः उषा मंगेशकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. तिच्या गाण्यात लता दिदींची छबी पाहायला मिळते असं मत त्यांनी व्यक्त करून गौरीचं विशेष कौतुक केलं होतं.

gauri gosavi winner lil champs 2021
gauri gosavi winner lil champs 2021

प्रेक्षकांमध्ये मात्र या विजेत्या क्रमांकावरून नाराजी पाहायला मिळत आहे. अंतिम पाच स्पर्धक ठरलेले असताना स्वरा जोशी आणि रीत नारंग यांना संधी देण्यात आली होती. त्यातून स्वरा जोशीने अंतिम फेरीत स्वतःचे नाव नोंदवले मात्र रीत नारंग ही देखील, अतिशय उत्तम गाणं गात होती तिला अंतिम पाचमध्ये निवडले जावे अशी अपेक्षा प्रेक्षकांनी केली होती. तर प्रज्योत गुंडाळे याला देखील या शोमधून अलगद बाजूला काढले गेले असे अनेकांचं म्हणणं आहे. रीत नारंग आणि प्रज्योत हे दोघेही अंतिम फेरीसाठी पात्र होते. त्यांनी अनेक गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अमराठी असूनही रितने मराठी भाषिक गाणी अगदी सुरेख गायली होती. त्यामुळे रीतची निवड अंतिम फेरीत करण्यात यावी अशी मागणी तीच्या चाहत्यांनी केली होती. तर प्रज्योतला देखील मुद्दामहून डावलण्यात आलं असा नाराजीचा सूर सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या आयोजक आणि पाचही परिक्षकांविरोधात केलेला पाहायला मिळतो आहे. अंतिम सोहळ्यासाठी ५ स्पर्धकांची परीक्षकांनी केलेली निवड ही चुकीची आहे असेही नाराज प्रेक्षकांनी म्हटलं आहे.

aarya ambekar mugdha kartiki rohit prathamesh little champs
aarya ambekar mugdha kartiki rohit prathamesh little champs

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.