काल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बालगंधर्व रंगमदिरात ठेवण्यात आले होते. त्यावेळी असंख्य जनसमुदाय साश्रु नयनांनी दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला होता. विक्रम गोखले यांच्या निधनाने मराठीच नव्हे तर अगदी बॉलिवूड सृष्टीत देखील हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. मराठी सेलिब्रिटींनी विक्रम गोखले यांच्या अगणित आठवणी जाग्या करत श्रद्धांजली वाहिली. विक्रम गोखले हे अभिनयाचं विद्यापीठ होते; अशा शब्दात अश्विनी भावेने त्यांचं कौतुक केलं. विक्रम गोखले हे केवळ उत्कृष्ट अभिनेतेच नव्हते तर ते कलाकारांना वेळोवेळी मार्गदर्शन देखील करत असत.

स्वतः पुढाकार घेऊन कामाचे पैसे मिळवून देणं असो किंवा नवख्या कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक करणं असो. अमुक एक सिन आवडला नसल्याचे दिग्दर्शकाला समजावून सांगणं असो. शशांक केतकरचे नाटक पाहायला गेल्यावर, केवळ पंधरा मिनिटं लवकर आलास म्हणून मोठा नट झालास की काय असे म्हणत; वेळोवेळी कान पिळणारे काका असोत. या भूमिका त्यांनी निभावल्या म्हणून आम्ही कलाकार म्हणून घडलो याची जाणीव त्यांनी अनेकांना करून दिली होती. विक्रम गोखले मराठी सृष्टीत सर्वांचे काका म्हणून ओळखले जात. पण संकर्षण कऱ्हाडेसाठी ते गोखले साहेबच होते. ते संकर्षणला नेहमी ‘संक्रमण’ म्हणून हाक मारत. खोपा चित्रपटामुळे या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती.

या चित्रपटाची आठवण सांगताना संकर्षण त्या चित्रपटातला फोटोची गम्मत सांगताना गोखले साहेबांनी मला आरसा दाखवला होता असे तो न विसरता म्हणतो. गोखले साहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना संकर्षण लिहितो की, “आणि विक्रम गोखले साहेबांनी चक्कं मला रंग लावला हो.” मी विक्रम गोखले सरांना “गोखले साहेब” असं म्हणतो आणि ते कधीच मला संकर्षण म्हणाले नाहीत, “संक्रमण” म्हणायचे. खोपा नावाच्या एका सिनेमात ते माझे आजोबा होते. गुंडांसोबतच्या मारामारीत मला जबर जखम होते. ती जखम दाखवण्यासाठी केलेला मेकअप त्यांना “खरा वाटत नव्हता. ते म्हणाले, सगळ्यांना माहिती आहे; सिनेमातली जखम खोटीच असते.
पण ती खरी वाटली पाहिजे आणि त्यांनी स्वत: माझा मेकअप केला हो आरसा दाखवला. ह्याच सिनेमातली अजुन एक आठवण सांगतो, काही सिन्स त्यांना लिखाणात आवडले नव्हते. म्हणुन मी ते rewrite केले. साहेबांनी vanity van मध्ये दिग्दर्शक आणि निर्मात्यांना बोलवून सांगीतलं कि, “ह्या मुलाला credits मध्ये विशेष सहाय्य म्हणुन नाव द्या अन्यथा त्याचे पैसे द्या.” हि सगळी कित्ती थोर असल्याची लक्षणं आहेत. कुठलाही कलाकार त्याच्या कला गुणांइतकाच त्याच्या सोबतच्या सिनियर्स मुळे घडतो. माझं भविष्यात काही चांगलं झालं तर; त्यात “गोखले साहेबांचा ही मोठ्ठा वाटा असेल.”