Breaking News
Home / जरा हटके / लग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण
manasi naik live in relationship
manasi naik live in relationship

लग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण

गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांच्यात काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू झाली होती. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशा आशयाच्या अनेक पोस्ट ती गेले काही दिवस शेअर करताना दिसली. यालाच अनुसरून मानसी आणि प्रदीपचा घटस्फोट होणार अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. घटस्फोटाच्या बातमीला दुजोरा देत मानसी नाईक हिने मीडियाला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे अशी माहिती सांगितली. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींचा खुलासा केलेला पाहायला मिळाला.

manasi naik live in relationship
manasi naik live in relationship

एखादी व्यक्ती आपल्याला सोडून देऊन इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते ही गोष्ट माझ्यासाठी समजण्या पलीकडची आहे. पण मला आता या गोष्टी मागे सारून माझ्या करिअरवर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. असे तिने म्हटले होते, मात्र आता प्रदीप आणि तिच्या नात्यातील काही गुपितं देखील तिने उघड केलेली पाहायला मिळत आहेत. मानसी आणखी एका मुलाखतीत बोलताना म्हणाली की, जागतिक संकटाच्या काळात आम्ही दोघेही लिव्हिइन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. तेव्हा आम्ही एकमेकांना खूप समजून घेत होतो, एकमेकांशी चांगले वागत होतो. मात्र काही लोक फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी एखाद्या व्यक्तीशी नातं जोडण्याचा प्रयत्न करत असतात. प्रसिद्धी आणि पैसा मिळेपर्यंत ते चांगले असतात, त्यांच्याकडून मिळेल तेवढं ते घेतात.

pradeep parera manasi naik
pradeep parera manasi naik

नेमकं असंच काहीसं माझ्यासोबतही घडलं आहे.मी जास्त बोलणार नाही पण अशा बऱ्याच गोष्टी असून लवकरच लोकांसमोर आणायच्या आहेत. मानसीच्या या बोलण्यातून प्रदीपच्या वागण्याचा हेतू काय होता हे तिनं उघड केलं आहे. केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रदीपने लग्न करण्याचा घाट घातला होता, असेच तिच्या बोलण्यातून आता समोर आलं आहे. या नात्याबद्दल बोलताना मानसी म्हणाली होती की, कुठेतरी तुमचा एखाद्या गोष्टीवरून विश्वास उडतो आणि हे माझ्याबाबत घडलं आहे. दुर्दैवाने आमच्या नात्यात असं काहीच नव्हतं. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला नेहमी पाठिंबा देतो. पण जर असं नसेल तर यातून बाहेर पडणंच योग्य आहे. सध्या बरेच लोक मानसिक आरोग्यावर मुलाखत देतात.

दोघांनी एकमेकांना कसे समजून घ्यावे, तुमच्या जोडीदाराशी संवाद कसा साधावा हे सांगतात. पण तुमच्या नात्यात असा समजूतदारपणाच नसेल तर ती एक धोक्याची घंटा ठरते. त्यामुळे अशा नात्यातून बाहेर पडा आणि पुढे जा. एकीकडे मानसीच्या या उलगड्यानंतर ती पूर्णपणे खचली असल्याचे दिसून येते. स्वामींचा जप करत स्वतःला सावरत आपल्या करिअरकडे पूर्ण लक्ष देत असल्याचे तिच्या बोलण्यावरून स्पष्ट होते. तर दुसरीकडे मात्र प्रदीप हे नातं संपुष्टात येत असल्याचे पाहून आनंद साजरा करताना पाहायला मिळाला. आपल्या मित्रांसोबत पार्ट्या आणि ट्रिप एन्जॉय करताना दिसतो आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.