रिक्षाचालकांची मुजोरी आणि अरेरावी अनेकांनी अनुभवली आहे. सगळेच रिक्षाचालक असे नसले तरी थोड्या प्रमाणात असलेले हे मुजोर रिक्षाचालक मात्र प्रवाशांना नाहक त्रास देणारे ठरतात. रात्री अपरात्री प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षाचालक म्हणतील त्याप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारतात आणि ते त्यांना द्यावेही लागतात. अशा वेळी मात्र प्रवाशांनी सतर्क राहणे तितकेच गरजेचे असते. असाच काहीसा अनुभव सैराट चित्रपट फेम सल्या म्हणजेच अरबाज शेख ला आला आहे. अरबाज गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहे मात्र नुकताच त्याला रिक्षावाल्याकडून नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
पुण्यात रिक्षा वाल्यांकडून लूट सगळेच रिक्षावाले असे असतील असे नाही असे म्हणत अरबाजने या घटनेची माहिती दिली आहे. नांदेड सिटी ते पुणे स्टेशनला जायचे १९८ रुपये होतात. मी कधीच ओला, उबेर, रॅपिडो असले ॲप वापरत करत नाही. पाऊस चालू होता मित्राला म्हणालो पावसात कुठे सोडायला येतो आणि परत ये ये आणि जा जा. माझ्या मित्राने मला रिक्षा करून दिली रॅपिडो ॲप वरून. पाऊस सतत चालू होता. नांदेड सिटी मधून रिक्षा निघाली, त्याने मला खूप फिरवले. मी त्याला सांगितलं दादा तू खूप फिरवतो, त्यावर त्याने काही उत्तर दिले नाही. वर त्याने ६० रुपये एक्स्ट्रा मागायला सुरुवात केली. याबाबत अरबाजने रिक्षाचालकाला जाब विचारला तर रिक्षावाल्याने त्याला शिवी देण्यास सुरुवात केली.
पाऊस चालू आहे, तू हितेच उतर, जास्त बोलू नको. मी रोज रिक्षा चालवतो तू नाही ६० रुपये एक्स्ट्रा द्यावे लागेल नाही तर हितेच उतर. पाऊस असल्यामुळे आणि पर्यायाने गैरसोय होऊ नये म्हणून अरबाज त्या रिक्षातून उतरू शकत नव्हता शिवाय ६ वाजताची ट्रेनही पकडायची होती. गावी जायचं होत. अरबाज सैराट चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याने रिक्षाचालकाला आपली ओळख सांगून मदत घेतली असती मात्र तसे न करता त्याने ओळख सांगितली नाही. माझ्या सारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर हे असे फेस करावे लागत असेल. तर गावावरून किंवा फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील याची जाणीव त्याला झाली.
बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांची हे लोक किती लूट करत असतील. हे कुठे तरी थांबल पाहिजे अशी त्याने अपेक्षा केली आहे. यावर ठोस निर्णय घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल अशी त्याने अपेक्षा व्यक्त केली आहे. अरबाजची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अरबाजने रिक्षाचालकाचे नाव आणि रिक्षाचा नंबर दोन्ही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जेणेकरून त्या मुजोर रिक्षाचालकवर योग्य ती कारवाई केली जाईल. यात प्रवाशांची लूट होऊ नये हाच त्याचा यामागचा उद्देश आहे.