Breaking News
Home / नाटक / सही रे सहीचा नाटकाचा तब्ब्ल १९ वर्षांचा हाऊसफुल प्रवास

सही रे सहीचा नाटकाचा तब्ब्ल १९ वर्षांचा हाऊसफुल प्रवास

sahi re sahi

दिग्दर्शक लेखक केदार शिंदे, रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांची जोडी यांनी सही रे सहीचा नाटकाचा तब्ब्ल १९ वर्षांचा  हाऊसफुल प्रवास पूर्ण केला आहे.

sahi re sahi
sahi re sahi

रंगभूमीवर करा किंवा Camera समोर करा अभिनय हा अभिनय असतो. पण काही गोष्ठींच भान असणं आवश्यक आहे. रंगभूमीवर काम करत असताना तुम्हाला शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षका पर्यंत पोहोचायच असत… त्यासाठी देहबोलीच – आवाजाचं एक वेगळ वर्किंग असत. तर याउलट Camera समोर काम करताना तुमचे अतिशय सूक्ष्म हावभाव सुद्धा टिपले जातात, त्यामुळे काही Technical गोष्टी खुप जपाव्या लागतात.

सिनेअभिनेता आणि प्रसिद्ध नाट्य कलाकार भरत जाधव यांची Instagram वरील हि प्रतिक्रिया खूप बोलकी आहे.

तब्बल ३३३३ तीन हजार तीनशे तेहतीस प्रयोगांचा यशस्वी टप्पा गाठणारे “सही रे सही” हे मराठी नाटक, आणि “गलगले” या  व्यक्तीरेखाच्या अफलातून भूमिकेतील भरत कधीही विसरण्यासारखा नाही.

एकाच नाटकात अभिनेत्यासाठी वेशभूषा आणि रंगभूषामध्ये  पूर्ण बदल करून अगदी काही सेकंदांत रंगमंचावर हजर होऊन वेगवगळ्या भूमिकेचा अभिनय करणे हे क्लिष्ट काम एकदा दोनदा नव्हे तर सहा वेळा एका पाठोपाठ ‘सह रे सही’ या नाटकात पार पडणाऱ्या भरतने या नाटकाचे सर्व प्रयोग  यशस्वीरित्या केले आणि त्याचा दशकभर त्याचा सिक्वल केला असून आणि आजही हे नाटक चालू आहे!

आपल्या विनोदी व्यक्तिरेखांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेते भरत जाधव यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीला नव्याने ओळख मिळवून दिली. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये त्यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. एखाद्या साध्या सरळ भूमिकेलाही अत्यंत प्रभावीपणे सादर करण्याची जादू भरत यांच्याकडे आहे.

 

तसेच भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर आणि संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा समावेश असलेले ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचे सुमारे ८००० प्रयोग संपूर्ण भारत आणि जगभरात विविध भाषांमध्ये झाले, ज्यात भरतच्या भूमिकेमुळे या नाटकाला एक रंजक वळण मिळे, आजही हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

 

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार भरत काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत. नाटक क्षेत्रातील बऱ्याच गमती जमती, अगदी सही रे सही सोडण्यापर्यंत झालेला निर्णय आणि अंकुश चौधरी याने कसा तोडगा काढला; असे सर्व काही ते काही शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत राहतात.

 

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.