Breaking News
aai kuthe kay karte
aai kuthe kay karte
Home / मराठी तडका / आई कुठे काय करते मालिकेतून ही अभिनेत्री घेणार एक्झिट?…

आई कुठे काय करते मालिकेतून ही अभिनेत्री घेणार एक्झिट?…

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत लवकरच अभि आणि अनघाचा साखरपुडा पार पडणार आहे त्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले असून या सोहळ्यात ईशा, गौरी, यश यांच्यासह अभि आणि अनघाही वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरताना दिसणार आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुडा सोहळ्याचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या बातमी सोबतच मालिकेतील आवडते पात्र एक्झिट घेणार असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

मालिकेतील अनिरुद्ध आणि अरुंधती यांची लाडकी लेक म्हणजेच “ईशा” काही दिवसांसाठी एका दुसऱ्या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहे. ईशाचे पात्र साकारले आहे अभिनेत्री “अपूर्वा गोरे” हिने. अपूर्वा गोरे लवकरच सब टीव्ही वरील “वागळे की दुनिया” या लोकप्रिय मालिकेत एक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. वागळे की दुनिया ही हिंदी मालिका अभिनेता सुमित राघवन अभिनित करत आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसत आहे यात आता अपूर्वाला देखील त्याच्यासोबत हिंदी मालिकेत झळकण्याची संधी मिळणार आहे. याच कारणामुळे अपूर्वा गोरे आई कुठे काय करते मालिका साकारत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र अपूर्वाने स्वतः याबाबत खुलासा केला आहे की ती आई कुठे काय करते ही मालिका तुर्तास तरी सोडणार नाहीये .

या मालिकेने अपूर्वाला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे ईशा या पात्रामुळे मी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहे त्यामुळे मी ही मालिका सोडत नाहीये असे ती म्हणते. मालिकेतील सतत हसमुख असलेले ईशाचे पात्र प्रेक्षकांनाही हवेहवेसेच असल्याने ‘तू ही मालिका सोडू नकोस’ अशा प्रतिक्रिया तिला मिळत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.