Breaking News
Home / बॉलिवूड / आशिष विद्यार्थी यांचे थाटात पार पडले दुसरे लग्न.. पहिल्या पत्नीही आहेत अभिनेत्री
ashish vidyarthi marriage
ashish vidyarthi marriage

आशिष विद्यार्थी यांचे थाटात पार पडले दुसरे लग्न.. पहिल्या पत्नीही आहेत अभिनेत्री

आज गुरुवारी २५ मे रोजी बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी फॅशन इंटरप्रिटर असलेल्या रुपाली बरुआ सोबत लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. आशिष विद्यार्थी आणि रुपाली यांचा नववधूवराच्या गेटअपमधला लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आशिष विद्यार्थी यांचे हे दुसरे लग्न आहे. हिंदी मालिका अभिनेत्री राजोशी बरुआ सोबत आशिष विद्यार्थी यांचे पहिले लग्न झाले होते. त्यांना एक मुलगाही आहे. राजोशी विद्यार्थी यांनी १९९३ मध्ये मुंबईतील एफएम स्टेशन टाइम्स एफएमवर रेडिओ जॉकी आणि निर्माता म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

ashish vidyarthi marriage
ashish vidyarthi marriage

सुहानी सी एक लडकी आणि ‘इमली’ या मालिकेत सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले आहे. राजोशी विद्यार्थी या ५८ वर्षांच्या आहेत. आशिष  विद्यार्थीच्या दुसऱ्या पत्नीचे नाव रुपाली बरुआ आहे. रुपाली बरुआ या गुवाहाटीच्या आहेत. एक फॅशन उद्योजक म्हणून त्या ओळखल्या जातात. कोलकातामधील एका अपस्केल फॅशन स्टोअरशी त्या निगडित आहेत. दुसऱ्या लग्नाबाबत आशिष विद्यार्थी म्हणतात की, माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न होणे ही एक विलक्षण भावना आहे. आम्ही सकाळी कोर्ट मॅरेज केले आणि संध्याकाळी गेट टूगेदर करणार आहोत असे त्यांनी मीडियाला कळवले आहे. आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ कसे भेटले याबद्दल ते म्हणतात की, शूटदरम्यान आशिष विद्यार्थी रुपाली बरुआला भेटले होते.

rupali barua ashish vidyarthi
rupali barua ashish vidyarthi

फॅशन शूटनंतर त्यांनी मोबाईल नंबर्सची देवाणघेवाण केली आणि एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांपासून डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आशिष विद्यार्थी यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून फार पूर्वीच घटस्फोट घेतला होता, त्यामुळे या लग्नाला रूपालीने होकार दिला. आज कोर्टात लग्न पार पडल्यानंतर लगेचच संध्याकाळी रिसेप्शन पार पडणार असल्याचे रुपाली बरुआ यांनी मीडियाशी बोलताना म्हटले आहे. या लग्नाला काही मोजक्याच मित्रमंडळीना आणि नातेवाईकांना त्यांनी आमंत्रण दिले होते. पण संध्याकाळी मोठ्या थाटात रिसेप्शन पार पडेल. ज्यात आम्ही बऱ्याच पाहुण्यांना सेलिब्रिटींना आमंत्रित केले आहे, असे या दोघांनी स्पष्ट केले आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.