Breaking News
Home / मराठी तडका / लवकरच आईबाबा होणार म्हणत प्रसिद्ध अभिनेत्याने दिली आनंदाची बातमी
rohit parshuram wife pooja avhad
rohit parshuram wife pooja avhad

लवकरच आईबाबा होणार म्हणत प्रसिद्ध अभिनेत्याने दिली आनंदाची बातमी

प्रत्येक चाहत्याला त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या खाजगी आयुष्यबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. त्यामुळे ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका जोरदार चर्चेत आली आहे. अपार मेहनत करून मालिकेची अप्पी आता कलेक्टर बनली असल्याने गावातील लोकांना तिच्याविषयी आदर निर्माण झाला आहे. नुकताच मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता मालिकेतील अर्जुन वाईट मार्गाने पैसा कमावतो हे अप्पीला लवकरच समजणार आहे.

appi aamchi collector rohit parshuram
appi aamchi collector rohit parshuram

अर्जुन आता अप्पीपासून या गोष्टी लपवून ठेवण्यात अयशस्वी होणार आहे. मालिकेतील अर्जुन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हा अर्जुन खऱ्या आयुष्यात आता लवकरच बाबा होणार आहे. नुकताच पत्नीसोबतचा एक खास फोटो शेअर करून त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांना कळवली आहे. मालिकेत अर्जुनची भूमिका अभिनेता रोहित परशुराम याने साकारली आहे. रोहित हा मूळचा पुण्यातील भोरचा.​ छत्रपती शिवाजी विद्यालय भोर येथील शाळेतून रोहितचे प्राथमिक शिक्षण झाले. रायगड ज्ञानपीठ फार्मसी कॉलेज मधून त्याने उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. शरीरसौष्ठव म्हणून राष्ट्रीय पातळीवर तो कामगिरी बजावत होता. अशातच त्याला अभिनय क्षेत्रात येण्याची नामी संधी मिळाली. रोहित परशुराम याने आपल्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणातच खलनायकाची भूमिका साकारली होती.

rohit parshuram wife pooja avhad
rohit parshuram wife pooja avhad

अर्जुनच्या या भूमिकेचे मोठे कौतुक सुद्धा झाले होते. रोहित अनेकदा मालिका चित्रपटातून छोट्या मोठ्या सहाय्यक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. अप्पी आमची कलेक्टर मालिकेतून तो प्रथमच प्रमुख भूमिकेत झळकला आहे. या मालिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. रोहितची पत्नी पूजा आव्हाड ही देखील मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती. तिने अनेक सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. काही सौंदर्यस्पर्धेत तिने फायनलपर्यंत मजल मारली होती. या दोघांनी लवकरच आईबाबा होणार असल्याचे त्यांच्या चाहत्यांना कळवले आहे. त्यावरून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.