Breaking News
Home / मराठी तडका / असा हवाय समृद्धी केळकरला लग्नासाठी मुलगा..
samruddhi kelkar

असा हवाय समृद्धी केळकरला लग्नासाठी मुलगा..

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली समृद्धी केळकर सध्या आगामी प्रोजेक्ट निमित्त चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विजेता अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर दोन कटिंग ३ या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यानिमित्ताने समृद्धी आणि अक्षयने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी समृद्धीला लग्नासाठी कसा नवरा मुलगा हवाय याचा खुलासा तिने केलेला पाहायला मिळाला. समृद्धीला लग्नासाठी मुलाकडून फार काही अपेक्षा नाहीये. तो कुठल्या प्रोफेशन मध्ये काम करतोय याबाबतही मला काहीच हरकत नाही. तो लॉयल असावा आणि माझ्यावर प्रेम करणारा असावा.

samruddhi kelkar
samruddhi kelkar

मी एक अभिनेत्री आहे आणि मला याच क्षेत्रात पुढेही काम करायचंय त्यामुळे कलाक्षेत्रातला नसला तरी त्याला कलेची जाण आणि त्याची आवड असणारा असावा. पण ती पुढे असेही म्हणते की, मी इथे मुंबईत काम करते त्यामुळे साहजिकच तो मुलगा मुंबईतलाच असावा. डान्सचे कार्यक्रम, गाण्याचे, तबला वादनाचे कार्यक्रमांची त्याला आवड असावी. एकंदरीत संगीत आणि कलेची त्याला आवड असायला हवी. त्याला कमीतकमी माहीत तरी असावं की मी काय करतीये. सोबतच तो डॉग लव्हर असावा कारण, माझ्या बाबांनी मला घरी कधीच कुत्रा पाळून दिला नाही. त्यामुळे त्याच्याकडे कुत्रा असायला हवा अशी माझी अपेक्षा आहे. समृद्धी असे म्हणताच अक्षय तिची खिल्ली उडवायला लागतो.

samruddhi kelkar akshay kelkar
samruddhi kelkar akshay kelkar

नवऱ्या मुलाने कुत्र्यासोबत एक फोटो काढावा त्याच्या जोडीला एक तबला, पेटी असं छान जमवून तो फोटो तिच्याकडे पाठवावा. आणि तरीही एवढं सगळं असतानाही समृद्धीच्या फार काही अपेक्षा नाहीत असं म्हणत तिची खिल्ली उडवली जाते. अक्षय केळकर जेव्हा मराठी बिग बॉसच्या घरात दाखल झाला त्यावेळी त्याचे नाव समृद्धीसोबत जोडले जात होते. एकाच आडनावावरून हे दोघेही बहीण भाऊ आहेत असे काहींचे म्हणणे होते. तर काहींनी त्यांचे लग्न झालंय असेही म्हटले. यावर समृद्धीने मौन सोडलेले पाहायला मिळाले. आम्ही दोघे एकमेकांचे कोणीही नातेवाईक लागत नाहीत. तो केवळ माझा एक चांगला मित्र आहे बस एवढंच, असे म्हणत तिने या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.