२४ नोव्हेंबर रोजी झिम्मा २ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. झिम्मा हा चित्रपट हेमंत ढोमे याने प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. झिम्मा चित्रपटाला महिला वर्गाकडून खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे याच चित्रपटाची पुढची गोष्ट आता झिम्मा २ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे सुचित्रा बांदेकर यांची भाची आणि निर्मिती सावंत यांची सून अशी या मालिकेत तीन नव्या पात्रांची एन्ट्री करण्यात आली आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू पहिल्यांदाच सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मिती सावंत आणि चित्रपटातील कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता असे रिंकू म्हणते.
दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार मंडळी ठिक ठिकाणी भेट देत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्रा बांदेकर यांनी झिम्मा २ हा माझा शेवटचा चित्रपट असेल असे म्हटले आहे. त्या असे का म्हणाल्या हे त्यांच्याच मुलाखतीतून जाणून घेऊयात. मित्रांचा सिनेमा म्हणून मी या सिनेमात काम करतीये असे सुचित्रा या मुलाखतीत सांगतात. त्या म्हणतात की, बाईपण भारी देवा, झिम्मा हे दोन्ही चित्रपट मला मित्रांमुळेच मिळाले. क्षिती ही माझी चांगली मैत्रीण आहे. तिने मला झिम्मा साठी विचारलं होतं. त्यामुळे साहजिकच मी झिम्मा २ चाही भाग झाले. तर केदार हा माझा खूप चांगला मित्र. बाईपण भारी देवा हा सिनेमा मी त्याच्यामुळेच केला. मला नटायला फारसं आवडत नाही.
पण अगोदर वंदना मावशी आणि आता निर्मिती मावशी या दोघी माझ्या नटण्याची जबाबदारी घेतात. माझ्या २० ते २२ वर्षाच्या कारकिर्दीत मी फार काही सिनेमे केलेले नाहीत, मोजून ८ च सिनेमे मी केले आहे. कदाचित झिम्मा २ हा माझा शेवटचा सिनेमा असेल. असे त्या म्हणाल्या. पण पुढे त्यांनी यावर असेही म्हटले की, जर मला सिनेमे मिळालेच तर मी ते नक्की करेन. असेही त्या स्पष्टीकरण देताना म्हणतात. झिम्मा २ या चित्रपटातील कलाकारांसोबत सुचित्रा यांचे छान बॉंडिंग जुळून आले होते. हा चित्रपट करत असताना सोहमला त्यांनी अजिबातच मिस केलं नाही कारण सिद्धार्थ त्याची कमतरता पूर्ण करत होता. झिम्मा २ हा चित्रपट तुम्ही पाहून गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांशी कसे वागणार हे तुम्हाला शिकवून देणार आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्की थीएटर मध्ये जाऊन बघा असे आवाहन त्या प्रेक्षकांना करत आहेत.