भल्या भल्यांना घाम फुटेल अशी बेधडक आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू ॲसिड हल्ल्याची शिकारी झाली आहे. तिचा चेहरा खूप विद्रूप झाला आहे आणि अशा चेहऱ्याचा तिचा फोटो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहते देखील चिंतेत असून अनेक जण मोठ्या द्विधावस्थेत पडले आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अशात आता तिचा हा फोटो सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. रिंकूचा चेहरा कसा भाजेल? कोणी आणि का बरे करेल असं? असे अनेक प्रश्न चाहते विचारत आहेत. तर चाहत्यांच्या या प्रश्नांची उत्तरे त्यांना आता मिळणार आहेत.
रिंकूचा हा फोटो खऱ्या आयुष्यातील नसून सिनेमातील दुनियेतला आहे. आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटातील रिंकूचा हा फोटो आहे. या चित्रपटात ती असिड हल्ला झालेली एक मुलगी दाखविण्यात आली आहे. चित्रपटातील या लूकसाठी तिने असा मेकअप केला आहे. या चित्रपटात रिंकू प्रमुख भूमिका साकारणारा असून प्रेम आणि त्यातून वाईट मार्गावर पोहचलेली एक विकृती यांवर आधारित आहे. आपल्या देशात स्त्रिया आणि त्यांची सुरक्षितता यांवर आता पर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट काही तरी नवीन घेऊन येतं आहे असं जाणवतं. या चित्रपटात विशाल आनंद हा नवोदित कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे.
चित्रपटात मकरंद देशपांडे मुख्य पात्र साकारत आहेत. हा चित्रपट प्रत्येक मुलीसाठी एक वेगळी उमेद घेऊन येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन हे खुशबू सिन्हा यांनी केलं असून आठवा रंग प्रेमाचा हा त्यांच्या दिग्दर्शनातील पहिलाच चित्रपट आहे. क्यू हो गया ना या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर कर्णिक यांनी आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटासाठी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ॲसिड हल्लाचा भाग प्रथमदर्शी हा बॉलिवूडच्या छपक या चित्रपटासारखा वाटत आहे. कुणाल गांजावाला, सोनू निगम, आदर्श शिंदे, साक्षी होळकर आणि शाहीद मल्ल्या या गायकांची चित्रपटाची गाणी चांगलीच व्हायरल होत आहेत.