Breaking News
Home / बॉलिवूड / आमची भांडणं झाली नाही मात्र त्याने.. दिवसभर आदिलसोबत असताना राखीने केला वेगळाच खुलासा
rakhi sawant adil khan durrani
rakhi sawant adil khan durrani

आमची भांडणं झाली नाही मात्र त्याने.. दिवसभर आदिलसोबत असताना राखीने केला वेगळाच खुलासा

मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली राखी सावंत आता वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. आईच्या आजारपणामुळे राखी खूप दुःखी आहे. आईला लवकर बरे वाटावे म्हणून तिने प्रार्थना करण्याची विनंती तिच्या चाहत्यांना केली होती. त्यावेळी मीडियासमोर आल्यावर राखीने आपल्या आयुष्यात खूप दुःख आहेत असेही म्हटले होते. दोन दिवसांपूर्वीच राखीने बॉयफ्रेंड आदिल दुराणी सोबत लग्न केल्याचा दावा केला होता. आदिल सोबत लग्न झाल्याचा व्हिडीओ आणि काही फोटो पुरावे म्हणून शेअर केले होते. आदिलसोबत खूप अगोदरच राखीने लग्न केले असल्याचे मीडियाशी बोलताना म्हटले. मात्र आदिल ह्या गोष्टी मान्य करायला आता नकार देत आहे.

rakhi sawant adil khan durrani
rakhi sawant adil khan durrani

आदिलच्या नकारामुळे राखी पूर्णपणे खचली आहे, ती सतत रडत आहे. तिचं मन दुखावलंय अशी मीडिया माध्यमातून चर्चा पाहायला मिळाली. मात्र इथे चित्र काही वेगळेच पाहायला मिळाले. आदिलने राखीला फसवलं, तिच्याकडून प्रसिद्धी मिळवली आणि लग्न करूनही आता तो या गोष्टीला नकार देत आहे. म्हणून आदिलला मीडियाने धारेवर धरले आहे. मीडियाने याबाबत आदिलशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी राखी सोबत लग्न केलं नाही असा दावा त्याने केला. हे व्हिडीओ फोटो सगळं फेक आहे असे तो म्हणाला. या फोटोंचे स्पष्टीकरण देण्यास मी तयार आहे. पण मला दहा दिवसांचा वेळ द्या, त्यावेळी मी तुम्हाला एक पूर्ण एपिसोड बनेल एवढी माहिती देतो. आदिलच्या या बोलण्यावर राखी मात्र नाराज आहे.

adil khan durrani rakhi sawant
adil khan durrani rakhi sawant

सोबतच आईच्या आजारपणामुळे ती खचली आहे. मात्र चेतना सिंग हिने आदिलला याबाबत जाब विचारला तेव्हा आदिल म्हणाला की मी दिवसभर राखी सोबतच होतो. तुम्ही अशा गोष्टी सतत विचातुन आम्हाला त्रास देत आहात. मी याबाबत लवकरच स्पष्टीकरण देईल. तेव्हा आदिल कडून योग्य उत्तर न मिळाल्याने चेतनाने लगेचच राखीला कॉन्फरन्स कॉल लावला आणि दोघांनाही स्पष्टीकरण विचारले. तेव्हा राखीने सुद्धा आम्ही एकत्र भेटतो, बोलतो हे कबूल केले. पण मग राखी मिडियासमोर का सतत राडतीये? असा प्रश्न चेतनाने तिला विचारला. तेव्हा राखी म्हणाली की, मी माझ्या आईसाठी रडतीये. पण तिथेच आदिलने सुद्धा माझ्यासोबत लग्न केले आहे, याचा खुलासा तो मीडियाला देत नाही म्हणून मी खूप टेन्शनमध्ये आहे.

मला फक्त त्याच्याकडून एवढंच कबुल करून घ्यायचं आहे की त्याने माझ्यासोबत लग्न केलेलं आहे. त्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं किंवा नाही, ह्यावर त्याला काही बोलायचं आहे किंवा नाही हे त्याने ठरवावं. मात्र तो ही गोष्ट मीडियाला जाहीर करत नाही ही गोष्ट मला खटकते आहे. यावर आदिलने सुद्धा राखीला शांत केले आणि मी लवकरच याबद्दल बोलेल असे आश्वासन दिले. आम्ही दोघे आजही भेटलो होतो, भेटत राहू आमच्यात काहीही भांडण वगैरे झालं नाही. जो गैरसमज आहे तो लवकरच मिटवून त्याचे उत्तर मी तुम्हाला देईल असे उत्तर आदिलने राखीला आणि मीडियाला सुद्धा दिले आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.