Breaking News
Home / जरा हटके / साखरपुड्यानंतर प्रथमेश क्षितिजाची लगीनघाई.. प्रथमेशच्या नावाची सजली मेंदी, हळदीला झाली सुरुवात
prathmesh parab kshitija ghosalkar wedding
prathmesh parab kshitija ghosalkar wedding

साखरपुड्यानंतर प्रथमेश क्षितिजाची लगीनघाई.. प्रथमेशच्या नावाची सजली मेंदी, हळदीला झाली सुरुवात

टाईमपास चित्रपट अभिनेता प्रथमेश परब लवकरच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर सोबत लग्न करत आहे. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या दोघांनी मोठ्या थाटात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांच्या लग्नाच्या अगोदरच्या विधींना सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. काल बुधवारी क्षितिजाने तिच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेंदी सजवली आहे. या क्षणाचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. मेंदी सोहळ्यानंतर आज त्यांच्या हळदीचा सोहळा रंगणार आहे.

prathmesh kshitija haladi
prathmesh kshitija haladi

श्रीवर्धन येथे क्षितिजा पारंपरिक पद्धतीने हळद साजरी करत आहे. त्यानंतर लगेचच या दोघांचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी क्षितिजा आणि प्रथमेश यांनी क्षितिजाच्या आजोळी भेट दिली होती. तिथे होणाऱ्या जावयाचे म्हणजेच प्रथमेशचे जोरदार स्वागत आणि आदरातिथ्य करण्यात आले. त्याच वेळात या दोघांनी समुद्रकिनाऱ्यावर प्रिवेडिंग फोटोशूट करून घेतले होते. लग्नानिमित्ताने हे दोघेही कोकणातल्या गावी पोहोचले असल्याचे दिसून आले. आता या दोघांच्या लग्नाची घटिका समीप आलेली आहे त्यामुळे सेलिब्रिटी विश्वात त्यांच्याच लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. २४ फेब्रुवारी रोजी म्हणजेच येत्या शनिवारी हे दोघेही विवाहबद्ध होत आहेत.

prathmesh kshitija engagement
prathmesh kshitija engagement

प्रथमेश परबची प्रमुख भूमिका असलेला डिलिव्हरी बॉय हा चित्रपट गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या प्रथमेशला त्याच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी अजिबातच वेळ नव्हता. त्यामुळे त्याच्या लग्नाची खरेदी ही क्षितिजानेच केलेली पाहायला मिळाली होती. क्षितिजा सध्या एनजीओसाठी काम करत आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये कॅन्सरवर तिने प्रोजेक्ट बनवले होते. त्यानंतर तिने पूर्णवेळ एनजीओसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या सर्वात प्रथमेशची तिला भक्कम साथ मिळाली होती. चार वर्षांच्या डेट नंतर आता हे दोघे विवाहबंधनात अडकताना दिसणार आहेत. आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.