Breaking News
Home / मराठी तडका / बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसाद जवादेची मालिकेत एन्ट्री.. या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
prasad jawade new serial
prasad jawade new serial

बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसाद जवादेची मालिकेत एन्ट्री.. या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये सहभागी झालेला स्पर्धक प्रसाद जवादे याने अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष्य वेधुन घेतले होते. या शोमधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जाते. नियम व अटी लागू या नाटकातून अमृताला अभिनयाची संधी मिळते हे पाहून प्रसादने तिचे अभिनंदन केले होते मात्र आता प्रसाद कडेही एक चांगला प्रोजेक्ट आलेला पाहायला मिळतो आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसाद पुन्हा एकदा मराठी मालिकासृष्टीकडे वळला आहे. वहिनीसाहेब मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री घेणाऱ्या प्रसादला कलर्स मराठी वाहिनीवर झळकण्याची संधी मिळाली आहे.

prasad jawade new serial
prasad jawade new serial

काही दिवसांपूर्वीच या वाहिनीवर काव्यांजली ही मालिका दाखल झाली. या मालिकेत प्रसाद जवादे प्रीतमच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच त्याची या मालिकेत डॅशिंग एन्ट्री होत आहे त्यामुळे प्रसादच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रसाद हा मूळचा पुण्याचा. पुण्यातील थिएटर ग्रुपमध्ये तो सहभागी झाला होता. २००६ साली वहिनीसाहेब या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पाऊल टाकले होते. माझिया प्रियाला प्रित कळेना, सरस्वती अशा मालिकांमधून तो झळकला आहे. पण मधल्या काळात त्याला काम मिळणे कठीण झाले तेव्हा त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे हिंदी चित्रपटात, मालिकांमधून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

prapti redkar prasad jawade
prapti redkar prasad jawade

मधल्या काळात मराठी इंडस्ट्रीतून गायब झालेला प्रसाद जवादे बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. नवनवीन टास्क आणि रॉकिंग परफॉर्मन्स मुले प्रसाद पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. बिग बॉसनंतर प्रसाद जवादेकडे काहीच काम आले नाही. मात्र सध्या अमृता आणि प्रसाद एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चामुळे प्रसाद प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. याचाच फायदा म्हणून कलर्स मराठी वाहिनीने त्याला काव्यांजली मालिकेतून प्रमुख भूमिका देऊ केली आहे. मराठी बिग बॉस मधील धमाल मस्ती नंतर आता प्रसादला पुन्हा एकदा मालिका सृष्टीत वावरताना पाहून चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. या नवीन भूमिकेसाठी प्रसाद जवादेचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

About admin

चित्रपट, लघुपट, दूरचित्रवाणी मालिका, नाटक, एकांकिका, संगीत आणि या सर्वांसाठीच्या स्पर्धा आणि पारितोषिके यासारख्या विविध क्षेत्रात मराठी करमणूक विषयी एकाच छताखाली सर्व माहिती प्रकाशित करणे हा कलाकर.इन्फो या वेबसाईटचा मुख्य उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.