प्राजक्ता माळी एकाचवेळी विविध क्षेत्रात आपले करिअर घडवताना पाहायला मिळते आहे. अभिनय क्षेत्राच्या जोडीला ती डान्सचे क्लासेस चालवते. याशिवाय प्राजक्तराज या नावाने तिचा ज्वेलरी ब्रँड आहे. तर कर्जत येथील फार्महाऊस देखील तिने पर्यटकांसाठी खुले केलेले आहे. अशा विविध माध्यमातून मुशाफिरी करणाऱ्या प्राजक्ताची तब्येत आज अचानक बिघडली आहे. याचे कारण म्हणजे महिन्याच्या ६ तारखेला प्राजक्ता तिच्या प्राजक्तराजचा एक नवीन दागिना लॉन्च करत असते. इन्स्टग्रामवर लाईव्ह येत प्राजक्ता तिच्या ब्रँडच्या नवीन दागिन्याची ओळख करून देत असते.
मात्र आज ६ तारखेच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये प्राजक्ताच्या जागी दुसऱ्याच कोणालातरी पाहायला मिळाले. यावेळी तिच्या सहकाऱ्यांनी लाईव्ह येत प्राजक्तराजचा नवीन दागिना लॉन्च केला. तनया आणि जान्हवी अशी तिच्या सहकाऱ्यांची नावे होती. त्यापैकी तनयाने व्हिडिओच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांकडे दिलगिरी व्यक्त केली. सर्वात आधी तुमचा अपेक्षा भंग केल्याबद्दल मी तुमची माफी मागते. प्राजक्ताताईला काही कारणास्तव लाईव्ह येता आलं नाही, तिची तब्येत थोडीशी बिघडली आहे असे त्यांनी म्हटले. त्यानंतर प्राजक्तराज ब्रँड मधील कोयरी तोडे हा बांगडीच्या प्रकारातील दागिना त्यांनी लॉन्च केला. प्राजक्ताला बरं नाही हे समजताच तिच्या चाहत्यांनी तब्येतीची चौकशी करण्यासाठी मेसेजेस केले.
काल ५ सप्टेंबर रोजी प्राजक्ताने तिच्या नवीन दागिन्याबद्दल एक हिंट दिली होती. ६ तारखेला मी हा दागिना लॉन्च करत आहे असे तिने पोस्टद्वारे म्हटले होते. पण प्राजक्ताचे सध्याचे शेड्युल खूपच बिझी आहे. तीन अडकून सीताराम हा तिचा नवीन कॉमेडी चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त प्राजक्ता विविध ठिकाणी भेटी देत आहे. अशातच तिची तब्येत थोडीशी बिघडली असल्याचे सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच सहकाऱ्यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल प्राजक्ताने त्या दोघींचेही आभार मानले आहेत.