पांडू हा चित्रपट गेल्या काही दिवसांपूर्वी थेटरमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड लावताना दिसला. काल रविवारी ३० जानेवारी रोजी पांडू चित्रपट झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित करण्यात आला होता. चित्रपटासोबतच त्यातली गाणी देखील लोकप्रियता मिळवताना दिसली. या चित्रपटातील जाणता राजा या गीताचे पार्श्वगायिका अबोली गिऱ्हे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गायिका अबोली हिने आदित्य कुडतरकर ह्याच्या सोबत लग्नाची गाठ बांधली आहे. आदित्य हा म्युजीशीयन असून अनेक कार्यक्रमातून त्याने आपली कला सादर केली आहे. गेल्या वर्षी या दोघांची एंगेजमेंट पार पडली होती. वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचे केळवण साजरे करण्यात आले होते. त्यावरून हे दोघेही लवकरच लग्न करणार अशी चर्चा होती.
लग्नाअगोदर त्यांनी प्रिवेडिंग फोटोशूट केले होते त्याचे फोटो दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केले होते. २९ जानेवारी रोजी मोठ्या थाटात त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नाचे काही खास फोटो त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले असून त्यांच्यावर मित्रमंडळींनी आणि चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. अबोलीने काही मालिकांचे शीर्षक गीत गायले आहे. सुरेश वाडकर यांच्या म्युजिक अकॅडमीमधून संगीताचे शिक्षण घेतले आहे. झी युवा वरील युवा सिंगर एक नंबर या शोमध्ये पार्टिसिपेट केले होते. इथूनच अबोलीला प्रसिद्धी मिळाली होती. कल्याण ज्वेलर्सच्या ऍडसाठी अबोलीने गायलं होतं. मसुटा या चित्रपट गीतासोबतच झी युवावरील फुलपाखरू या लोकप्रिय मालिकेचे शीर्षक गीत अबोलीने गायले आहे.
तसेच झी मराठीवरील काहे दिया परदेस या मालिकेचे शीर्षक गीत देखील गायले आहे. रंगलया हे लग्न गीत नुकतेच रिलीज करण्यात आले होते हे गीत अबोली गिऱ्हे आणि अतुल जोशी यांनी गायलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पांडू चित्रपटातील आदर्श शिंदे सोबत जाणता राजा हे तीने गायलेलं गीत तुफान लोकप्रिय झालं. पांडू चित्रपटनिमित्त चला हवा येऊ द्याच्या मंचावर ही सर्व टीम एकत्रित जमली होती त्यात अबोलीने देखील सहभाग दर्शवला होता. मराठी चित्रपट गीते आणि मालिका शीर्षक गीते गाऊन अबोलीने मराठी सृष्टीत स्वताची ओळख निर्माण केली आहे. अबोली गिऱ्हे आणि आदित्य कुडतरकर या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.