निवेदिता सराफ यांनी बालवयातच नभोनाट्यातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. आई विमल जोशी आणि वडील गजन जोशी यांच्याकडून त्यांना अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. निवेदिता सराफ यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्यांनी अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल उलगडा केला आहे. सोबतच आताच्या वयात आपल्याला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळतेय याचेही त्यांनी आभार मानले आहेत. वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पण त्यांना या वयात खरं तर कामाची गरज आहे, त्यांना काम मिळवून द्या अशी खंत त्यांनी ज्येष्ठ कलाकारांबाबत व्यक्त केली आहे. निवेदिता सराफ यांचे आईवडील दोघेही नाटकातून काम करत तेव्हा सखाराम भावे यांनी निवेदीताचा सांभाळ केला. तर बबन प्रभूंनी निवेदिता सराफ यांचे नाव बदलले. निवेदिता सराफ यांची थोरली बहीण मीनल यांनी त्यांचे नाव चंदाराणी असे ठेवले होते. त्यावेळी मीनल चार साडेचार वर्षांच्या होत्या. पण आता हे आठवलं की हे नाव त्यांना मुळीच आवडत नसल्याचे सांगतात. बबन प्रभूंनी शाळेतील चंदाराणी हे नाव बदलून निवेदिता असे ठेवले होते. दहावी इयत्तेत असताना निवेदिता यांनी पहिल्यांदा मैत्रिणींसोबत जाऊन त्रिशूल हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला होता.
मधल्या काळात त्या रंगभूमीवर चांगल्या रुळल्या होत्या. निवेदिता यांना क्रिकेटचा खेळ प्रचंड आवडायचा. निवेदिता सराफ म्हणतात, मला अजित वाडेकर हा क्रिकेटर प्रचंड आवडायचा. नाटकात रमलेल्या निवेदिता सराफ यांना लहानपणीच चित्रपटात पाऊल टाकले होते. प्रभाकर गोखले यांच्या परिवर्तन या चित्रपटात त्या बालकलाकार म्हणून झळकल्या होत्या. माझ्या रे प्रीती फुला हे निवेदिताच्या वडिलांचं गाणं, या चित्रपटाचे शूटिंग पुण्यात सुरू होते. त्यावेळी अनुपमाच्या मांडीवर निवेदिता बसल्या होत्या. प्रभाकर गोखले यांनी अनुपमा आणि निवेदिताला पाहताच दोघी सेम दिसत असल्याचे म्हटले होते. तेव्हाच त्यांनी परिवर्तन चित्रपटात अनुपमाच्या बालपणीची भूमिका निवेदिता साकारणार हे ठरवून ठेवले होते.
अभिनयाची पार्श्वभूमी असल्याने निवेदिता सराफ यांना या क्षेत्रात सहज वावरता आले. पण अनिकेतच्या जन्मानंतर त्यांनी जवळपास १४ वर्षांचा ब्रेक घेतला. अग्गबाई सासूबाई या मालिकेने त्यांना पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आणले. या वयातही आपल्याला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळते याचे त्यांनी आभार मानले. खरं तर ज्येष्ठ कलाकारांना काम द्यायला हवे हे त्यांचे स्पष्ट मत आहे. या वयातच त्यांना कामाची खूप गरज असते हेही त्या अधोरेखित करतात.