स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहे. मालिकेत मोरे कुटुंबावर अनेक संकटं आली, मात्र प्रत्येक संकटांना या कुटुंबाने पळवून लावले. मालिकेत काहीतरी अघटित घडणार अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा ट्विस्ट नेमका काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अंजीसाठी पश्याने बांगड्या आणलेल्या असतात. हे दोघे आता आपल्या संसाराची स्वप्न रंगवत असतानाच अंजीच्या हातातील बांगड्या फुटतात.
हे पाहून अंजी हा अपशकुन असल्याचे म्हणत घाबरून जाते. मोरे कुटुंबावर त्यामुळे आणखी एक संकट कोसळणार आहे. मालिकेत वैभवच्या भूमिकेत आता तुम्हाला नवीन कलाकार पाहायला मिळत आहे. याअगोदर हे पात्र अमेय बर्वे याने साकारले होते. अमेय या मालिकेत सुरुवातीपासूनच हे पात्र रंगवताना दिसला. अमेय आणि साक्षीची जुळून आलेली केमिस्ट्री या मालिकेतून प्रेक्षकांना आवडली होती. मात्र नव्या प्रोजेक्टच्या कारणास्तव अमेयने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मालिका सोडताना सहकलाकारांना मिस करणार असे म्हटला होता. मालिका सोडण्याचे कारण सांगितलेले नसले तरी त्याच्या नसण्याने आता मालिका पाहण्याची मज्जा गेली आहे अशा आशयाच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
आता मालिकेत नवीन वैभव ची एन्ट्री झाली आहे.अभिनेता निमिष कुलकर्णी ही भूमिका निभावत आहे. निमिष कुलकर्णी याने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून प्रेक्षकांना हसवलं आहे. अभिनयाची आवड असल्याने त्याने रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. नाटकातून काम करत असताना महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये झळकण्याची संधी मिळाली. या शोमुळे निमिषला चांगली प्रसिद्धी मिळाली, याचाच फायदा म्हणून सहकुटुंब सहपरिवार मालिकेत वैभवची भूमिका मिळाली. या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं आहे. अमेयने त्याच्या अभिनयाने ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवली होती. त्यामुळे निमिषसाठी ही भूमिका तेवढीच आव्हानात्मक ठरणार आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील विनोदी अभिनय अनुभवानंतर निमिष मालिका विश्वात पदार्पण करत आहे. सहकुटुंब सहपरिवार मालिकेत वैभवच्या भूमिकेत आपल्याला प्रेक्षक स्वीकारतील असा विश्वास निमिषला आहे. निमिष रसिक प्रेक्षकांना आवाहन करत म्हणतो की, नमस्कार मंडळी आजपर्यंत मी केलेल्या प्रत्येक कामावर तुम्ही प्रेम केलंय. आणि तुम्हीच दाखवलेल्या प्रेमामुळे मी एका नवीन भूमिकेत तुमच्यासमोर येतोय. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत मी आजपासुन वैभव हे पात्र साकारणार आहे. आधीच्या वैभव वर जितकं प्रेम केलंत, तितकंच प्रेम माझ्यावरही राहूद्या.