तारक मेहता का उलटा चष्मा ही लोकप्रिय मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेतील नट्टू काकांची भूमिका गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते “घनश्याम नायक” यांचे आज ५.३० वाजता मालाड येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. घनश्याम नायक हे गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते आज अखेर त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली. घनश्याम नायक हे तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत सुरुवातीपासून सक्रिय होते. काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला होता. कॅन्सरवर उपचार घेतल्यावर काही एपिसोडसाठी ते मालिकेत दाखल झाले होते मात्र तब्येत आणखीनच खालावत चालल्याने त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
गुजराथी हिंदी नाटक खिचडी, एक मेहल हो सपणो का, सारथी, साराभाई vs साराभाई या हिंदी मालिका तसेच आखें, तिरंगा, मासुम, बेटा, लाडला, क्रांतिवीर, बरसात, चाहत यासारख्या अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली होती. कॅन्सरवर उपचार घेऊन ते मालिकेत सक्रिय झाले होते त्यांचे मत असे होते की, मी एक कलाकार आहे आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत मी या कलेची सेवा करत राहीन. मला मृत्यू देखील काम करत असतानाच यावा अशी एक ईच्छा त्यांनी व्यक्त केली होती… मात्र त्यांची ही ईच्छा अधुरीच राहिली.. घनश्याम नायक यांचे निधन झाल्याची बातमी त्यांच्याच मुलाने मालिकेतील कलाकार तन्मय वखेरीया याला फोनवरून दिली होती.
तन्मय म्हणतो की घनश्याम नायक यांना काही दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल केले होते मात्र त्यांच्या प्रकृतीत अधिकच खालावत चालली होती. मालिकेच्या इतर कलाकारांना त्यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा अनेकांनी त्यांच्याप्रती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. सेटवर सर्वच कलाकार नट्टू काकांच्या जाण्याने दुःखी देखील झाले आहेत. नट्टू काकांनी आज कायमची एक्झिट घेतली असली तरी त्यांनी वठवलेली ही भूमिका तमाम प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत. घनश्याम नायक यांना कलाकार.इन्फो च्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली…