सोशल मीडियावर नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओत नाना पाटेकर एका व्यक्तीला जोराची चपराक लावताना पाहायला मिळतात. अर्थात हा व्यक्ती नाना पाटेकर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तिथे आलेला असतो. पण सेल्फी न काढू देताच तो व्यक्ती तिथून हाकलला जातो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर होतो आणि नाना पाटेकर या व्हिडिओमुळे प्रचंड ट्रोल होताना दिसतात. जर्नी या आगामी चित्रपटाचे शूटिंग एका मार्केट मध्ये सुरू असते.
शूटिंग सुरू असतानाच त्या सेटवर हा प्रकार घडतो. नाना पाटेकर यांना मराठी सृष्टीत एक आदरचं स्थान आहे. पण या व्हिडिओमुळे त्यांची दुसरी बाजू समोर आली असे त्यांच्याबाबतीत म्हटले गेले. ही दुसरी बाजू पूर्णपणे खोटी आहे असे म्हणत नाना पाटेकर यांनी त्यांच्यावरच्या या ट्रोलिंगवर उत्तर देण्याचे ठरवले आहे. सोशल मीडियावर आपण ट्रोल होतोय हे पाहून त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, काल जो व्हिडिओ व्हायरल झाला तो चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला. हा सगळा चित्रपटाचाच एक भाग होता. आम्ही जर्नी चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्यात एका सिनमध्ये एक व्यक्ती माझ्यामागून येत असतो.
तो व्यक्ती मला ए म्हाताऱ्या टोपी विकायची आहे का असे म्हणून माझ्या टोपीला हात लावतो. त्यावेळी मी त्याला मारतो असा तो सिन होता. एक शॉट झाल्यानंतर आम्ही त्या सिनचा रिटेक घेतला. तेव्हा ती व्यक्ती मागून आली आणि मी त्याला मारतो असे दाखवले. पण मागून येणारी व्यक्ती ही दुसरीच कोणीतरी असल्याचे मला नंतर सांगण्यात आले. मला वाटलं तो आमच्याच टीमचा एक भाग आहे पण तो सेल्फी घेण्यासाठी तिथे आला असल्याचे मला कळले. हे कळल्यावर मी त्याची माफी मागण्यासाठी त्याला शोधत होतो. पण तोपर्यंत तो तिथून निघून गेलेला होता. माझ्याकडून ही चूक झाली. मी असं कोणाला कधीच करत नाही.
माझ्याकडे फोटो घेण्यासाठी अनेजण येत असतात मी त्यांना नेहमीच फोटो काढून देतो. हा चित्रपटाचा भाग असल्याने हे चुकन घडलं. हा व्हिडीओ त्याच्याच कोणी मित्राने काढलेला असावा आणि तो व्हायरल झाला. तुम्ही बघितलं असेलच आमच्या आसपास खूप गर्दी जमलेली होती. लोकं आम्हाला खूप सपोर्ट करत असतात. त्यांच्याकडून कधीच कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला झालेला नाही. लोकांचं आमच्यावर असलेलं हे एक प्रेम आहे. असे म्हणत नाना पाटेकर यांनी त्या तरुणाची जाहीरपणे माफी मागितली आहे. आणि ही गोष्ट चुकून घडली असेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलेले आहे.