Breaking News
Home / जरा हटके / महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील या कलाकाराच्या लेकीचे झाले लग्न …
ladka dadus daughter wedding ceremony
ladka dadus daughter wedding ceremony

महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील या कलाकाराच्या लेकीचे झाले लग्न …

मराठी सृष्टीतील विनोदी कलाकार दादूस म्हणजेच अरुण कदम यांच्या मुलीचा आज विवाह सोहळा पार पडला आहे. अरुण कदम यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा तसेच कॉमेडीची बुलेट ट्रेन सारख्या विनोदी शोमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचप्रमाणे अरुण कदम यांनी मराठी हिंदी चित्रपटातून छोट्या मोठ्या भूमिका देखील साकारल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांच्या लाडक्या लेकीचा सुकन्या हिचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला होता.

sukanya arun kadam wedding photos
sukanya arun kadam wedding photos

त्यावेळी कलाकारांनी सुकन्याच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती आणि सुकन्याला शुभेच्छा दिल्या होत्या. आज गुरुवारी २५ नोव्हेंबर २०२१ रोजी अगदी साध्या पद्धतीने सुकन्याने लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळते आहे. सुकन्या ही सागर पोवळे सोबत विवाहबद्ध झाली आहे. आज एकमेकांच्या गळ्यात हार घालून त्यांनी नोंदणी पद्धतीने त्यांचा हा लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नाचे फोटो सुकन्याने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नोंदणी पद्धतीने तिचे हे लग्न पार पडले असल्याने जवळच्याच नातेवाईकांना त्यांनी आमंत्रित केले होते. त्यामुळे कुठला गाजावाजा न करता अगदी साधेपणाने केलेले तिचे हे लग्न चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी सुकन्याच्या लग्नाची खरेदी करण्यात आल्याची बातमी तिच्या आईने सांगितली होती त्यानंतर सुकन्याचे केळवण साजरे करण्यात आले होते. स्मिता व सूर्यकांत सरजोशी यांनी तिचे केळवण केले त्यावेळी सुकन्या सासरी जाणार तिथे तिने कसं वागावं असा संदेश देणारे सुंदर पत्रक भेट म्हणून दिले होते. हे पत्रक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

sukanya kadam sagar povale family photo
sukanya kadam sagar povale family photo

अरुण कदम यांची मुलगी सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे शिवाय तिने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवले आहेत. मधल्या काळात तिने वडील अरुण कदम यांच्यासोबत टिकटॉक सारखे व्हिडीओज बनवले होते त्याला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. फुल स्टॉप एंटरटेनमेंट येथे सुकन्या ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत आहे. तर सागर पोवळे हा ब्रीविंग कन्सल्टंट, हेड ब्रिवर म्हणून बिअर क्षेत्रात कार्यरत आहे. सुकन्या कदम आणि सागर पोवळे या नवविवाहित दाम्पत्यास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

ladka dadus daughter wedding ceremony
ladka dadus daughter wedding ceremony

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.