मित्रहो, या चंदेरी दुनियेत प्रत्येक कलाकार पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होईल हे जरा अशक्यच, कलाकार उत्कृष्ट असला तरीही त्यांना मनपसंत भूमिका मिळवणेही तेवढेच जिकिरीचे. एखाद्या भूमिकेसाठी पात्र आहे की नाही याकडे प्रथम लक्ष दिले जाते, पण काही कलाकार एखाद्या मुख्य भूमिकेसाठी पात्र असूनही त्यांना इतर भूमिका साकारायला मिळतात. त्यामुळे पडद्यावर ज्या भूमिकेत किंवा वेषांतरात दिसतात तीच त्यांची कायमची ओळख बनून जाते.
खलनायक भूमिका बजावलेले कितीतरी कलाकार मेन हिरोच्या रोल मध्ये खूपच प्रभावी अभिनय करतात याची डझनभर उदाहरणे मिळतील. तसेच काही अभिनेत्री नेहमी पडद्यावर आईची किंवा वयस्कर स्त्रीची भूमिका निभावताना आपण पाहतो पण त्या खऱ्या आयुष्यात बॉलिवूड हिरोईन पेक्षाही खूप सुंदर आहेत. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या खऱ्या आयुष्यात दिसायला सुंदर आहेत पण पडद्यावर त्या नेहमी वयस्कर दाखवल्या जातात. हा लेख शेवट पर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला त्या अभिनेत्री कोण आहेत हे लक्षात येईल.
रिचा चड्डा ही अभिनेत्री सध्या बॉलिवूड मध्ये प्रेक्षकांच्या नजरेत येत आहे, हीने मसान आणि गॅंग्स ऑफ वासेपुर यांसारख्या चित्रपटांतून प्रसिद्धीच्या प्रवाहात आगमन केले आहे. अनुराग कश्यप ने दिग्दर्शित केलेल्या गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटात तीने नावाजुद्दीन सिद्दीकीच्या आईची भूमिका साकारली होती. ती दिसायला एवढी तरुण आणि सुंदर असूनही तीला यामध्ये एका वयस्कर महिलेची भूमिका स्वीकारावी लागली होती. तीने याबद्दल एका मुलाखतीत म्हटले होते की या चित्रपटानंतर तिला वाटले होते की बहुतेक तिचे करिअर संपुष्टात येईल कारण या चित्रतपटानंतर तीला लोकांच्या मनावर ठासलेली वयस्कर महिलेची प्रतिमा हटवायला खूप मेहनत घ्यावी लागली होती.
अर्चना जॉईस या अभिनेत्रीला आता सगळेच ओळखतात कारण २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला KGF या हिट चित्रपटात तीने यशच्या आईची भूमिका साकारली होती. ही भूमिका रसिकांना प्रचंड आवडली असून अजूनही या चित्रपटातील तीच्या भूमिकेला लोक छान प्रतिसाद देतात. तीने जरी या चित्रपटात आईची भूमिका साकारली असली तरीही खऱ्या आयुष्यात अर्चना खूप तरुण, ग्लॅमरस आहे. ही भूमिका निभावताना अर्चना फक्त २८ वर्षाची होती. पण तरीही तीने आपली भूमिका इतकी सुंदर निभावली आहे की लोक तिच्यासह तिच्या अभिनयाचे देखील दिवाने झाले आहेत. राजकुमार या आगामी चित्रपटात तिच्या अभिनयाचा मराठी प्रेक्षकांना आस्वाद घेता येईल, हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे.
रम्या कृष्णन रम्या ही बॉलिवूड मध्ये भरपूर प्रसिद्धीस आली आहे, सुपर डुपर हिट “बाहुबली” चित्रपटात तीने माता शिवगामी देवीची भूमिका साकारली. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली असून तीला सर्वत्र ओळखले सहसा याच भूमिकेमुळे मिळत आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटात रम्याने आजवर एकूण तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी भाषांत मिळून २०० चित्रपटात काम केले आहे पण बाहुबलीमुळे तीला विशेष ओळख मिळाली आहे. तीने आईच्या विविध भूमिका पार पाडल्या असल्या तरीही रम्या खऱ्या आयुष्यात दिसायला सुंदर अभिनेत्रींमध्ये मध्ये गणली जाते. आपल्या वैयक्तिक आयुष्यात तिला स्टायलिश राहणे खूप पसंत आहे.
अमृता सुभाष ही सर्वांच्या ओळखीची अभिनेत्री, लेखिका, गायिका आणि संगीतकार आहे. तिची अभिनेते प्रसाद ओक सोबतची अवघाचि संसार ही झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिका विशेष गाजली. साधा सरळ पण तितकाच प्रभावी अभिनय अनेकांना फार आवडतो. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या फिल्म गली बॉय मध्ये तीने रणवीरच्या आईची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दर्शवली आहे. अमृता जरी चित्रपटात आईच्या भूमिकेत दिसली असली तरीही खऱ्या जीवनात मात्र ती खूप तरुण आहे, तसेच ती दिसायलाही खूपच ग्लॅमरस आहे. तीचे फोटो पहाल तर तुमच्याही लक्षात येईल की अमृता सुभाष किती तरुण आणि सुंदर आहे.
सुप्रिया कर्णिक चा फॅन फॉलोअर खूप मोठा आहे, अनेक चित्रपटात आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये तीने उत्कृष्ट अभिनय केला आहे. २६ वर्षाची असताना तीने सुभाष घई यांच्या ” यादे ” चित्रपटात आईची भूमिका मिळवली होती. तीने वेलकम मध्ये देखील अक्षय कुमार च्या आंटीची भूमिका साकारली आहे. तसेच सुप्रिया ने अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका पार पाडल्या आहेत, तिच्या कॉमिक भूमिका देखील खूपच लोकप्रिय आहेत. पण जरी पडद्यावर ती नेहमी वयस्कर महिलेच्या भूमिकेत झळकली असेल तरीही खऱ्या आयुष्यात मात्र सुप्रिया खूपच सुंदर आणि हॉट आहे.
मेहेर विज ही सलमान च्या ” बजरंगी भाईजान ” या चित्रपटात मुन्नीच्या आईच्या भूमिकेत झळकली होती. सिक्रेट सुपरस्टार या संगीत नाटकात तिने सहायक भूमिका उत्कृष्ट रित्या निभावली आहे, चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला आहे. मेहेर ला जरी या चित्रपटात आईच्या भूमिकेत दाखवले असले तरीही मेहेर खऱ्या जीवनात फारच सुंदर दिसते, ती चित्रपटात खूप साधी, भोळी दाखवली आहे. पण मेहेर पडद्यामागे खूप छान दिसते, खूप ग्लॅमरस आणि सुंदर आहे.
अशा खूपशा अभिनेत्री आहेत ज्यांना आपण नेहमी आई, वाहिनी किंवा मोठ्या बहिणीच्या भूमिकेत पाहिले आहे, पण त्यांना प्रत्यक्ष पाहिले असता त्या किती रूपवान दिसतात याचा अंदाज व्यक्त करणे सोपे होईल. अशा वैशिट्यपूर्ण भूमिका करणाऱ्या आणखी अभिनेत्री तुमच्या आवडत्या असतील तर आम्हाला कळवायला विसरू नका. आम्ही त्या पुढील सदरात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू. तूर्तास रजा घेतो, लेख आवडला असल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.. लोभ असावा, धन्यवाद.