ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मिलिंद दस्ताने यांनी तुझ्यात जीव रंगला मालिकेतून राणाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी हिच्या साठी कायपण, बोला आलख निरंजन, अजिंक्य, माझी बायको माझी मेव्हणी अशा चित्रपटात काम केले आहे. मिलिंद दस्ताने यांना नुकताच एक वाईट अनुभव आला आहे. हा अनुभव त्यांनी मिडीयासोबत शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी मी कामानिमित्त मुंबईहून पुण्याला जात असताना मला हा अनुभव आला आहे. सुरुवातीला खालापूर टोलनाक्यावर त्यांच्या फास्ट टॅग मधून २०३ रुपये कट झाले. पुढे गेल्यावर तळेगाव टोलनाक्यावर आणखी ६७ रुपये असे एकूण २७० रुपये खात्यातून कट झाले. पुढे पुण्यात गेलो असता तिथली कामे उरकून मुंबईच्या दिशेने पुन्हा प्रवास सुरु झाला.
या प्रवासात अगोदर जेवढे टोलला पैसे कट झाले तेवढा अंदाज घेऊन त्यांनी आपल्या फास्ट टॅग खात्यात ती रक्कम ठेवली होती. पुढे तळेगाव टोलनाक्यावर त्यांच्या खात्यातून २०३ रुपये टोल कट झाला. पुढच्या येणाऱ्या टोलसाठी लागणारी रक्कम अगोदरच खात्यात असल्याने निश्चिंत राहून ते तासभर लोणावळ्याला थांबले. लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने जाताना पुढच्या टोलवर माझ्या फास्ट टॅग खात्यातून १३५ रुपये घेतले गेले. परंतु पुढच्यावेळी खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारण सांगून माझ्याकडून आणखी पैसे घेण्यात आले. पैसे वाजवीपेक्षा जास्त कट झाल्याने याचा जाब त्यांनी खालापूर येथील टोलनाक्यावर विचारला. मुंबईहून पुण्याला येताना २७० रुपये लागले आणि पुण्याहून मुंबईला जाताना २०३ आणि १३५ असे एकूण ३३८ रुपये लागले प्रत्यक्षात ही आमची, सामान्य नागरिकांची लूट आहे. मी तिथल्या लोकांना याबाबत विचारलं तर तिथल्या लोकांनी मला सांगितलं की दहा दिवसांपूर्वीच नियमात बदल केला आहे. केवळ एक तासासाठी लोणावळ्याला थांबल्याने माझा अगोदर काढलेला टोल त्यांनी रद्द केला होता. मुंबई पुणे असा रोजचा प्रवास अनेकजण करत असतात. अशावेळी विश्रांतीसाठी आम्ही तासभर देखील कुठे थांबू नये का? असा सवाल त्यांनी आता उपस्थित केला आहे. मिलिंद दस्ताने म्हणतात की उघडउघड लूट होत आहे याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा असेही त्यांनी सुचवले आहे. तिथल्या तक्रार वहीत मी माझी तक्रार नोंदवली आहे मात्र यावर योग्य उत्तर मला मिळाले नाही, शिवाय ही सरासरी फसवणूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. असे अनुभव अनेकांना वारंवार येत असतात केवळ वेळ वाया जाऊ नये गर्दी कमी व्हावी या हेतूने फास्ट टॅग सुरू केले मात्र त्यातून होणारी प्रवाश्यांची लूट कधी थांबणार हा प्रश्न अनुत्तरित आहे….