माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि परांजपे यांचं लग्न होणार असतं. मात्र परांजपे नेहाचं घर बळकावून ते विकण्याच्या तयारीत असतो. आणि परीला देखील तो दूर नेऊन सोडणार असतो. हे सत्य समजताच नेहा परांजपेच्या कानाखाली वाजवते. त्यावर नवऱ्याने टाकून दिलेल्या बाईशी कोण लग्न करणार, असे म्हणून परांजपे नेहवर ओरडतो. हे पाहून यश परांजपेला मारायला जातो, परांजपे तिथून पळ काढतो. पण त्याचा पाठलाग करून यश त्याची धुलाई करतो आणि नेहाची माफी मागायला लावून, त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो.
दरम्यान या सर्व घटनेमुळे नेहा मात्र अस्वस्थ होते. आई उदास आहे हे पाहून परीला तिला पूर्वीसारखं हसताना पाहायचं असतं. त्यासाठी ती यशला फोन करून आई उदास असल्याचे सांगते. तेव्हा यश नेहाला एक सरप्राईज देतो. फुलांचा गुच्छ घेऊन एक व्यक्ती नेहाकडे येतो आणि त्यात एक कार्ड असतं ते पाहून नेहाच्या चेहऱ्यावर हसू येतं. तर तिकडे काका काकू देखील नेहाला हसवायचा प्रयत्न करतात आणि तिच्यासमोर गमती गमतीत भांडण करतात. ह्या सर्व घडामोडी घडत असताना समीर यशला एक आठवण करून देतो. तू नेहाला सांगितलं आहेस की तू कोणाच्यातरी प्रेमात आहेस मग आता तू नेहावर प्रेम करतोस हे स्पष्ट सांगून टाक. त्यावर यश विचार करू लागतो आणि माझं सगळं सत्य नेहाला समजलं पाहिजे मगच मी तिला माझ्या प्रेमाबद्दल बोलेल. एकीकडे यश नेहाला सगळं खरं सांगण्याच्या तयारीत असतानाच परांजपे नेहाला रस्त्यात गाठतो.
माझ्याशी लग्न मोडून तुम्ही यशसोबत लग्न करायला मोकळे झाला, असे म्हणून आपला राग व्यक्त करतो. त्यावेळी परांजपे नेहाला यशबद्दल खुलासा करतो की, यश ५०० करोडोंचा मालक आहे. परांजपेने यशबद्दल हा खुलासा करताच नेहा गोंधळात पडते. परांजपेचे हे बोलणे नेहा आणि यशच्या नात्यात दुरावा निर्माण करणार का? हे पुढील भागात समजेल. मात्र याबाबत सत्य काय आहे हे यश कडून नेहाला जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच असणार. त्यावेळी यश प्रेमाची कबुली देणार का, की प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार हे लवकरच समजेल. मात्र नेहा आणि यश यांचे लग्न लवकरात लवकर व्हावे अशी प्रेक्षकांची ईच्छा आहे. परीची देखील याबाबत काय भूमिका असेल याचीही उत्सुकता आहे. त्यामुळे मालिका लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.