Breaking News
Home / मालिका / एलिशाचा नवा डाव.. ​​कुसूमच्या अकाउंटवरुन ​​ब्लॅकमेल​रला पैसे पाठवणार..
kusum marathi serial
kusum marathi serial

एलिशाचा नवा डाव.. ​​कुसूमच्या अकाउंटवरुन ​​ब्लॅकमेल​रला पैसे पाठवणार..

कुसुम ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेत सतत नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात अशात आता कुसुमच्या वाटेत अडथळा बनून आलेली एलिशा आता कुसुमसाठी एक नवीन सापळा रचणार आहे. या मालिकेत शिवानी बावकर ही कुसुमची मुख्य भूमिका साकारत आहे. लागिर झालं जी या मालिकेतून शिवानीला विशेष प्रसिद्धी मिळाली. आता तुमच्या आमच्यातली कुसुम ही मालिका देखील ती चांगलीच गाजवत आहे. सुरुवातीपासून कुसुम ही अनेक मुलींसाठी एक आदर्श बनून राहिली आहे.

kusum marathi serial
kusum marathi serial

आपलं लग्न झालं असलं तरी देखील माहेर आणि सासर दोन्ही कडे ती व्यवस्थित लक्ष देते. तिच्या मार्गातील सर्व अडथळे ती तिच्या बुद्धीने बाजूला सारते. अशात अजिंक्यबरोबर कुसुमचे लग्न झाले असून तिच्या ऑफिसमध्ये एली नावाची एक मुलगी आली आहे. जी सतत कुसुमला त्रास देऊ पाहते. आणि आता तर तिने कुसुमबरोबर गोड बोलून तिच्या अकाउंटचा पासवर्ड मागून घेतला आहे. साधी भोळी कुसुम कामात काही अडथळा नको म्हणून तिला पासवर्ड देखील देते. मात्र आता एलीशा या पासवर्डचा गैरवापर करणार आहे. ती कुसूमच्या अकाउंटवरुन ब्लॅकमेलरला पैसे पाठवते. आता कुसुमच्या नावाने पैसे गेल्याने पुढे काय होणार हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे.

actor ajinkya nanaware
actor ajinkya nanaware

तुमच्या आमच्यातली कुसुम ही मालिका ४ ऑक्टोबर २०२१ पासून सोनी मराठीवर पारदर्शीत करण्यात आली आहे. या मध्ये तनिष्का विषे, आरती मोरे, विदांगी कुलकर्णी या कलाकारांसह अजिंक्य ननावरे महत्वाची भूमिका साकारत आहे. मालिकेला अवघे तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र खूप कमी कालावधीत ही मालिका अनेकांच्या आवडीची बनली आहे. यातील सर्वच कलाकार आपल्या पात्राला पूर्ण पणे न्याय देत आहेत. त्यामुळेच मालिकेची प्रसिद्धी वाढली आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.