Breaking News
psi pallavi jadhav
psi pallavi jadhav
Home / जरा हटके / मराठी सृष्टीतील ही अभिनेत्री आहे खऱ्या आयुष्यात PSI …

मराठी सृष्टीतील ही अभिनेत्री आहे खऱ्या आयुष्यात PSI …

मराठी सृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे जी खऱ्या आयुष्यात पीएसआय अधिकारी बनली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “पल्लवी जाधव”. लहानपण अतिशय कष्टात गेलेल्या पल्लवीला अभिनयाचे वेड कसे लागले ते जाणून घेऊयात…

पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या. लहानपणापासून आपण हिरोईन व्हायचं, रॅम्पवर चालायचं, टिव्हीमध्ये झळकायचं हे स्वप्न पल्लवीने पाहिलं होतं मात्र जसजसे कळू लागले की आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, आपण एका शेतकऱ्याची मुलगी आहोत तसतसे हे स्वप्न स्वप्नच राहणार याची जाणीव पदोपदी होत गेली. पुढे शालेय शिक्षण झाल्यावर  तिच्या वयाच्या असणाऱ्या सर्वच मुलींची लग्न होत गेल्याने आई वडिलांनी पुढील शिक्षणासाठी नकार दिला मात्र यातूनही मार्ग काढून आपले शिक्षण थांबले नाही पाहिजे हा निर्णय मनाशी पक्का केला. आर्थिक परिस्थिची जाण असलेल्या पल्लवीने  कॉलेजचे शिक्षण आणि त्यानंतर  एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. हा अभ्यास करण्यासाठी आई वडिलांनी बचतगटातून ५ हजारांचे कर्ज काढून दिले ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून २०१५ साली ८०% गुण मिळवून एम ए मानसशास्त्र तिनं केलं. याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय परीक्षेत देखील  यश मिळवलं.

psi pallavi jadhav in uniform
psi pallavi jadhav in uniform
actress allavi jadhav photo shoot
actress pallavi jadhav photo shoot

गेल्या काही वर्षांपासून पल्लवी जाधव जालन्यातल्या महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करतात. नुकताच त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला तर मिस फोटोजेनिकचा पुरस्कारही त्यांनी प्राप्त केला आहे. अधिकारी बनण्याचे स्वप्न तर तिचे पूर्ण झालेच आता  लवकरच बबन चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या “हैद्राबाद कस्टडी” या चित्रपटातून पल्लवी जाधव अभिनेत्री बनून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण झाले असल्याचे सांगितले जाते मात्र चित्रपट कधी प्रदर्शित होईल हे अजून गुलदस्त्यात आहे.

pallavi jadhav photo shoot
charming actress pallavi jadhav
charming actress pallavi jadhav
miss india 2020 runner up
miss india 2020 runner up

 

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.