झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. रायासोबत ज्या कोणाचे लग्न होणार आहे तिचा मृत्यू निश्चित आहे असे भाकीत गुरुजींनी वर्तवले होते. रायासोबत लग्न केल्यानंतर कृष्णाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. मात्र त्यातून ती सुखरूप बाहेर पडायची. सध्या राया आणि कृष्णा त्यांच्या शेतमजुराच्या घरात राहत आहेत. भाऊसाहेबांबद्दल पेपरमध्ये बदनामी करणारी बातमी छापून आल्याने ते रायावर चिडलेले असतात. त्यामुळे तू ईथुनपुढे माझ्यासमोर जरी आलास तर मी तुझ्यावर गोळी झाडेन असे ते रायाला बजावून सांगतात.

भाऊसाहेब आपल्यावर चिडलेत त्यांचा राग कसा शांत करायचा या विचारात असतानाच कृष्णा रायाची समजूत घालते आणि सगळं चांगलं होईल असे त्याला म्हणते. राया आणि कृष्णा याचमुळे पुन्हा एकत्र आले आहेत आणि त्यांच्यात आता जवळीक देखील वाढू लागली आहे मात्र मालिकेत आता गुली मावशी कृष्णाला मारण्यासाठी सुपारी देत आहे. या संकटातून कृष्णा आणि रायाचा जीव जाणार का? कारण मालिकेच्या एका ट्विस्टमध्ये राया आणि कृष्णाच्या फोटोला हार लावण्यात आले आहेत. गुली मावशी त्या फोटोंसमोर बसून रडताना दाखवली आहे. त्यामुळे मालिकेतील हे संकेत राया आणि कृष्णाच्या जीवावर बेतणार का की हा केवळ गुली मावशीचा अंदाज असणार याचा लवकरच उलगडा होईल. गुली मावशीच्या कटकरस्थानातून राया आणि कृष्णा सुखरूप बचावले असणार असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे.

गुली मावशीला अनभिज्ञ ठेवण्यासाठीच राया आणि कृष्णाचा मृत्यू दाखवला जाणार का? यामागे रायाचा काही हात असणार का, हे येत्या काही दिवसातच समजेल. मात्र गुरुजींनी भाकीत केल्याप्रमाणे राया आणि कृष्णा यांचा खरंच जीव जाणार का, याचाही उलगडा लवकरच केला जाईल. मालिकेत आलेला हा ट्विस्ट प्रेक्षकांना धक्का देणारा असला तरी राया आणि कृष्णा गुली मावशीच्या जाळ्यात नक्कीच अडकणार नाहीत याची खात्री आहे. गेल्यावेळीप्रमाणे रायाने कृष्णावर आरोप लावले होते त्यावेळी कारखान्यातील भेसळ केलेली हळद प्रकरण रायानेच उघडकीस आणले होते. त्यामुळे याप्रसंगी देखील राया कृष्णालवर ओढवलेल्या संकटातून असाच वाचवणार आहे हे येत्या काही भागातच स्पष्ट होईल. त्यामुळे राया आणि कृष्णा सुखरूप असणार आणि गुली मावशीच्या कटकरस्थानाचा खुलासा होणार हे नक्की.
