बिग बॉसचा १७ वा सिजन येत्या १५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळीही सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करेल. यंदाच्या स्पर्धकांच्या यादीत अनेक संभाव्य नावांची चर्चा आहे त्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे नाव घेतले जात आहे. तर ९० च्या दशकातील वादग्रस्त अभिनेत्रीच्याही नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ही मराठमोळी अभिनेत्री आहे ममता कुलकर्णी. बिग बॉस च्या १७ व्या सिजनमध्ये ममता कुलकर्णी स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.
बिग बॉसच्या घरात आतापर्यंत जवळजवळ सर्व सीझनमध्ये नेहमीच वादग्रस्त स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आले आहे. मोनिका बेदी, पूजा भट्ट, तनिषा मुखर्जी, शमिता शेट्टी, रिमी सेन आणि मिनिषा लांबा यांसारख्या बॉलीवूड इंडस्ट्रीतील नावानंतर या सीझनमध्येही ममता सारखी आणखी एक वादग्रस्त अभिनेत्री येऊ शकते. बिग बॉसच्या शोमध्ये येण्यासाठी निर्मात्यांनी ममता कुलकर्णीशी संपर्क साधला आहे अशी चर्चा आहे. ममता ही ९० च्या दशकातील लोकप्रिय पण अतिशय वादग्रस्त अभिनेत्री ठरली होती. मॅगझिनमध्ये टॉपलेस पोज देण्यापासून ते तिच्या बोल्ड स्टेटमेंट्स आणि वादग्रस्त वैयक्तिक आयुष्यापर्यंत ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. २००३ मध्ये अभिनय सोडुन ती योगिनी बनली. विकी गोस्वामीशी तिने लग्न केले असल्याची अफवा होती.
ममताने तिच्या योगिनी जीवनावर एक पुस्तकही लिहिले आहे. ममतावर काही खटले प्रलंबित आहेत. जर ते अडथळे दूर झाले तर ती बिग बॉसच्या १७ व्या सिजनमधून इंडस्ट्रीत पुनरागमन करणार असल्याचे बोलले जाते. टॉपलेस फोटोशूटमुळे ममतावर केस दाखल करण्यात आली होती. त्यावेळी तिला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. अंडरवर्ल्डशी कनेक्शन ते योगिनी बनण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास खूपच वादग्रस्त ठरला आहे. त्याचमुळे ममता या शोमध्ये सहभागी झाल्यास मोठी कोन्ट्रोव्हर्सि मिळू शकते असा आयोजकांना विश्वास आहे. आणि म्हणूनच तिला बिग बॉसच्या शोमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. अर्थात ममता कुलकर्णी हे आमंत्रण स्वीकारणार का हे १५ तारखेच्या ग्रँड प्रीमियम सोहळ्यातच कळेल.