Breaking News
Home / जरा हटके / आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या लेकीचा हटके वाढदिवस
madhurani prabhulkar daughter birthday
madhurani prabhulkar daughter birthday

आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या लेकीचा हटके वाढदिवस

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने तिच्या मुलीचा म्हणजेच स्वरालीचा वाढदिवस एका हटके अंदाजात करण्याचे ठरवले. डॉ सोनम कापसे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या टेरासीन मध्ये स्वरालीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी स्वारालीला तिच्या मित्र मैत्रिणींसोबत कुकिंग करायचं होतं या हेतूने तशाच पध्द्तीने सजलेल्या एका रेस्टोरंटची शोधाशोध सुरू झाली. याबाबत मधुराणी प्रभुळकर हिने एक पोस्ट शेअर केली आहे त्यात ती म्हणते की, सामाजिक जाणीवपूर्वक जेवण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये सर्विससाठी कर्णबधीर मुलं आणि बेकर्स ऑटिस्ट (मतिमंद) मुलं! ऐकून आश्चर्य वाटलं नं? आणि हे रेस्टॉरंट आहे तुकाराम पादुका चौक, फर्ग्युसन रोड, पुणे येथे.

madhurani prabhulkar daughter birthday
madhurani prabhulkar daughter birthday

ही संकल्पना आहे कॅन्सरवर काम करणाऱ्या एका तरुण आणि हरहुन्नरी डॉ सोनल कापसे हिची. आणि तिला साथ देत तिथे खंबीरपणे उभा असतो तिचा नवरा शैलेश केदारे. सोनम कापसे यांनी समानतेच्या दिशेने एक छोटेसे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. प्रोफेशनल हेल्थकेअर आणि संशोधन तज्ञ शेतकरी आणि अपंग तरुणांना घेऊन “टेरासिन” ची संकल्पना सुरू केली. दरवर्षी स्वरालीचा वाढदिवस काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा अशी आमची इच्छा असते. ह्यावर्षी स्वरालीला मित्र मैत्रिणींबरोबर कुकिंग करायचं होतं. त्यामुळे तशी जागा शोधत असताना प्रमोदला हे रेस्टॉरंट सापडलं आणि मुलांनी एक वेगळं जग पाहिलं. त्यांनी कूकिंग केलं, गेम्स खेळले, सांकेतिक भाषा शिकले. आणि हे सगळं प्रमोदच्या कल्पनेतून आणि सोनल उत्साही सहकार्यातून शक्य झालं.

swarali birthday terrasinne socially conscious dining
swarali birthday terrasinne socially conscious dining

ह्या रेस्टॉरंटची काही वैशिष्ट्य असे आहे कि, इथल्या बेकरी मध्ये ऑटिस्ट मुलं काम करतात आणि आपल्याला ही लाजवतीलशी पिझ्झा, कपकेक, चॉकोलेट केक अशी अतिशय उत्तम बेकरी प्रोडक्ट बनवतात. इथली कर्णबधिर मुलं, मुली ही पूर्णतः दुसऱ्यांवर अवलंबून आहेत, शेतकऱ्यांची लेकरं आहेत. आणि ही माता त्यांची राहायची सुद्धा सोय स्वतःच्या हिमतीवर करते. इथे जागतिक खाद्य पदार्थ मिळतात आणि इथल्या पदार्थांसाठी वापरले जाणारे सर्व जिन्नस थेट स्थानिक शेतातून येतात. पुण्याच्या जेवणात आरोग्य आणि चव वाढवण्यासाठी जागतिक पदार्थ बनवण्यासाठी तिने नाचणी, ज्वारी, कोडो, बारनयार्ड, राजगिरा यांसारखे स्थानिक वडिलोपार्जित धान्य घेण्याचे ठरवले. प्रिझर्व्हेटिव्ह, रंग आणि ऍडिटीव्ह नसलेले अन्न इटालियन, चायनीज, भारतीय किंवा मेक्सिकन वैविध्यपूर्ण रेस्टोरंट आहे.

आणि ह्याचा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतला. इतके वेगवेगळ्या डिशेस त्यांनी दिल्या आणि आम्ही सगळेच नेहमी पेक्षा खूप जास्त जेवलो. पण तरीही कुठेही जडपणा, तडस लागणे हा अनुभव नाही. हे आमच्यासाठी खूपच आल्हाददायक होतं. सोनम कापसे यांचा विश्वास होता की दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नव्हे तर सन्माननीय व्यासपीठ आणि सुरक्षित भविष्य हवे. म्हणून त्यांना मराठमोळ्या जनतेसमोर स्वाभिमानाने आणण्याचे ठरवले. हे फक्त रेस्टॉरंट नाही तर एक अनुभव आहे. अशा विचाराने आणि वेगळ्या ध्येयाने काम करणाऱ्यांना आपण साथ द्या.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.