Breaking News
Home / बॉलिवूड / तन्वी हेगडेने आज्जी शशिकला सोबतच्या बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा..
shashikala grand daughter tanvi hegde
shashikala grand daughter tanvi hegde

तन्वी हेगडेने आज्जी शशिकला सोबतच्या बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा..

अभिनेत्री तन्वी हेगडे “Fruti” हे नाव रसिक प्रेक्षकांच्या अगदी ओठावरचे ; बोलके डोळे आणि हावभावांमुळे बाल कलाकार असल्या पासून आपला विशेष प्रेक्षक वर्ग असलेली सुंदर अभिनेत्री. तन्वी तिच्या अभिनय कौशल्याने हिंदी तसेच मराठी चित्रपती सृष्टीत नावारूपाला आली. ​

काही वर्षांपूर्वी तन्वीने मराठी चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण केले, “धुरंधर भातवडेकर” या तिच्या पहिल्या मराठी चित्रपटमध्ये तिने रसिक प्रेक्षकांना अप्रतिम  अभिनयाचा परिचय करून दिला .. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक झाले. त्यानंतरच्या काळात “अथांग”, “शिवा”, “हक्क” या आणखी काही मराठी चित्रपटातून तिचा नायिकेच्या भूमिकेतील अफलातून अभिनय पाहायला मिळाला. हिंदी चित्रपट तसे टीव्ही सीरिअल आणि आता मराठी चित्रपट  सृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या तन्वीच्या आई बाबांना आपल्या मुलीचा अभिमान वाटत असल्याचे तन्वीच्या आईने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते. एक चाईल्ड आर्टिस्ट ते मराठी चित्रपट सृष्टीची सुप्रसिद्ध नायिका असा तन्वी हेगडेचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे; खूप कमी बाल कलाकारांना रुपेरी पडद्यावर अशी संधी मिळते आणि त्या संधीचे सोन्यात रूपांतर करण्याची मेहनत त्याहून कमी जणांना.

beautiful actress tanvi hegde
beautiful actress tanvi hegde

जेष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर, लग्नानंतर शशिकला ओमप्रकाश सैगल या तन्वीच्या आज्जी होत्या, त्यांचे ४ एप्रिल रोजी निधन झाले. आपल्या प्रिय आज्जीची निर्वाणीची बातमी ऐकून तन्वी खूपच हळवी झाली होती. तिने शशिकला सोबतच्या आपल्या आठवणी जाग्या करीत बरेच किस्से सोशल मीडियावर पोस्ट केले होते. लहानपणी शूटिंग दरम्यान फावल्या वेळेत आज्जी खूप साऱ्या गोष्टी सांगायची हे तिने प्रकर्षाने आठवणीत नमूद केले. बालपणापासूनच ती आपल्या खानपानाची कशी काळजी घ्यायची, आपला होमवर्क कशा पद्धतीने करून घ्यायची; अभिनय संदर्भातील त्यांच्या गप्पा कशा रंगायच्या या सारणाचा खुलासा तिने या निमिताने केला. आज्जीकडून एक खास गोष्ट तन्वी शिकल्याचे तिने आवर्जून सांगितले की “आपल्या मतांवर ठाम राहणे आणि नेहमी बोलके असणे”.

fruti girl tanvi hegde actress
fruti girl tanvi hegde actress

शशिकलाबाईंनी मागील काही दशकात, मदर टेरेसा यांच्या कार्यावर प्रभावित होऊन निस्वार्थ भावनेने कुष्ठरुग्णांची सेवा देखील केली; पडेल ते काम करून त्यांनी समाजाप्रती माणुसकीची भावना ​जोपासत  सर्वांपुढे एक आदर्श ठेवला. ​​​आपल्या आज्जी प्रमाणेच ​एक बालकलाकार ते ​हिंदी चित्रपटात नायिका आणि पुढे ​मराठी चित्रपट सृष्टीची नायिका असा तन्वीचा प्रवास खूपच ​प्रभावित करणारा आहे, तन्वीला ​भविष्यात असेच यश मिळत राहो ​आणि नवनवीन भूमिकेतून आपल्या प्रतिभाशाली अभिनयाची संधी मिळत राहो ​हीच kalakar.info टीमतर्फे शुभेच्छा ​.​

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.