हसा चकट फु, एक शून्य बाबुराव, घडलंय बिघडलंय, आपण यांना पाहिलंत का? या मालिकांमधून आपल्या विनोदी अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सिद्धार्थ जाधवने हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिम्बा, राधे, कहाणी कॉमेडी सर्कस की, सर्कस के अजूबे अशा चित्रपट आणि कॉमेडी शोमधून सिद्धार्थ हिंदी सृष्टीतही झळकला आहे. बकुळा नामदेव घोटाळे, रझाकार, खो खो, जत्रा, प्रियतमा, धुरळा, ढोलकी, दे धक्का या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारताना दिसला.
लालबाग परळ चित्रपटातील त्याने निभावलेला गण्या उर्फ स्पीडब्रेकर आजवरच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळा ठरला होता. मिलच्या जागी शॉपिंग मॉल उभारले जाणार होते मात्र या मिलमध्ये काम कामगार बेरोजगार झाले होते. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अनेकांनी आवाज उठवला मात्र कालांतराने तो आवाज विरळ झाला. काम बंद पडल्याने कामगारांच्या कुटुंबावर आलेल्या परिस्थिचा आढावा महेश मांजरेकर यांनी लालबाग परळ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडला होता. या चित्रपटाला आज १० वर्षे पूर्ण झाली आहे. एक दर्शकपूर्ती झालेल्या ह्या चित्रपटाच्या अनेक आठवणी आहेत. नुकतेच लालबाग परळ चित्रपटातील सिद्धार्थच्या भूमिकेला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ह्या सोहळ्यात स्पीडब्रेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या निमित्ताने सिध्दार्थने एक पोस्ट लिहिली आहे आणि त्यात तो म्हणतो की, “लालबाग परळ” मधला स्पीडब्रेकर माझ्यासाठी कायमची लक्षात राहणारी आणि जवळची भूमिका आहे. “महाराष्ट्राचा फेवरेट कोण?” सुवर्णदशक सोहळ्यानिमित्त पुन्हा एकदा स्पीडब्रेकर लोकांसमोर येणार आहे..!
एक भूमिका एक दशकभर प्रेक्षकांच्या लक्षात राहते, प्रेक्षक भरभरून तिच्यावर प्रेम करतात. आणि त्याच भूमिकेला जेव्हा दशकातील सर्वोत्तम भूमिकेयासाठी नॉमिनेशन मिळतं तेव्हा नक्कीच माझ्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. महेश मांजरेकर सरांचे या निमित्ताने पुन्हा एकदा आभार, स्पीडब्रेकर साठी त्यांनी माझी निवड केली, माझ्यावर विश्वास टाकला. जे वातावरण मी माझ्या लहानपणापासून जगात आलो, त्याच वातावरणातील भूमिकेसाठी मला मिळणार नॉमिनेशन म्हणजे माझ्यासाठी सन्मानच आहे. आपल्या आवडत्या सिद्धार्थला नक्की वोट करा.