Breaking News
Home / मालिका / मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेत्रीचं केळवण.. लवकरच करणार लग्न
actress shweta ambikar kelvan
actress shweta ambikar kelvan

मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेत्रीचं केळवण.. लवकरच करणार लग्न

​स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेत काही दिवसांपासून शौनक आणि माऊच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळाली होती. मालिकेतील माऊ आणि शौनकचे लग्न कधी होणार याचीच प्रतीक्षा गेले कित्येक दिवसापासून प्रेक्षकांना होती. अखेरीस हा विवाह सोहळा महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आता शौनक आणि माऊच्या नव्या संसारात कुठल्या कुठल्या अडचणी येतात हे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मात्र एकीकडे मालिकेतला हा आनंदाचा क्षण अनुभवत असतानाच मालिकेतील आर्याची भूमिका निभावणारी अभिनेत्री लवकरच खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधणार असल्याचे दिसून येते.

mulgi zali ho aarya actress shweta ambikar
mulgi zali ho aarya actress shweta ambikar

अभिनेत्री श्वेता अंबिकर हिने मुलगी झाली हो या मालिकेत आर्याची भूमिका साकारली आहे. मालिकेत आर्याचे पात्र साकारणारी श्वेता अंबिकर हिचे नुकतेच केळवण साजरे करण्यात आले आहे. त्यामुळे श्वेता आता लवकरच लग्न देखील करणार आहे. लग्नाची तारीख तिने जाहीर केली नसली तरी तिच्या घरी लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. श्वेता अंबिकर तिचा मित्र आणि लेखक दिगदर्शक असलेल्या अमेय गोरे ह्याच्यासोबत येत्या काही दिवसातच लग्न करणार आहे. अमेय होतकरू बालकलाकारांसाठी Tree Theater Academy देखील चालवतो. शिवाय त्याचे शिवतीर्थनगर, कोथरूड येथे kekiz नावाने केक शॉप देखील आहे. श्वेताने मुलगी झाली हो या मालिकेव्यतिरिक माझे मन तुझे झाले, दुर्वा, पुढचं पाऊल, बाजी, तू माझा सांगाती, दिल दोस्ती दुनियादारी या मालिकांमधून काम केले आहे. श्वेताने पुण्यातच असताना आपले शिक्षण पूर्ण केले आहे. ललित कला केंद्र मधून तिने अभिनयाचे धडे गिरवले होते. यातूनच रंगभूमीवर तिचे पदार्पण झाले. नाटकांमधून काम करत असताना माझे मन तुझे झाले या मालिकेत तिला झळकण्याची संधी मिळाली होती. भेट हा मराठी चित्रपट तिने अभिनित केला होता. त्यातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते. गोंदया आला रे या शॉर्टफिल्म मध्येही तिने महत्वाची भूमिका निभावली होती.

kelvan shweta ambikar amey gore
kelvan shweta ambikar amey gore

​नाटक, चित्रपट, मालिकांमधून तिचा यशस्वी प्रवास चालूच आहे. काही दिवसांपूर्वी वडिलांच्या निधनाने श्वेता पुरती खचली होती त्यावेळी तिने वडिलांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट लिहिली होती. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली होती. श्वेताने मुलगी झाली हो या मालिकेत रोहनच्या बायकोची म्हणजेच माऊच्या वहिनीची भूमिका निभावली आहे. तिने साकारलेली आर्या प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. श्वेता आता लवकरच लग्न करणार म्हटल्यावर तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.