कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका असलेला पांडू हा चित्रपट महाराष्ट्रभर तुफान लोकप्रिय होत आहे. या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड देखील लावलेले पाहायला मिळतायेत. कुशल बद्रिके याला चला हवा येऊ द्या ह्या शोमधून मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. चला हवा येऊ द्याच्या मंचावर त्याने अनेकदा त्याच्या पत्नीचा उल्लेख केला आहे. तिच्या पाठिंब्यामुळेच मी आज हे यश गाठू शकलो असं तो आवर्जून सांगताना दिसतो. कुशल बद्रिके आणि सूनयना बद्रिके यांची लव्हस्टोरी खूपच भन्नाट आहे.
कुशल बद्रिके हा चाळीत राहणारा सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा. अंबरनाथ येथील कॉलेजमध्ये तो शिकायला होता त्यावेळी अनेक एकांकिका त्याने साकारल्या होत्या. खुल्या एकांकिका स्पर्धेसाठी त्याचं नाव टाकण्यात आलं होतं तेव्हा सूनयनाने ती फुलराणी मधील एक पॅच सादर केला होता त्या स्पर्धेत तिला बक्षीस मिळालं होतं. पुढे गडकरी रंगायतनला प्रयोग होता त्यावेळी धडक बसल्याने कुशलचे दात तुटले होते ह्या अपघातामुळे सुनयना कुशलची चौकशी करू लागली. दोघेही एकमेकांना आवडू लागले होते पण कुशलला तिला आपल्या प्रेमाची कबुली द्यायचे धाडसच होत नव्हते. कारण सूनयनाची आई ह्या शाळेतल्या मुख्याध्यापिका तर वडील रिटायर्ड ब्रँच मॅनेजर, त्यामुळे ती मला स्वीकारेल का? असा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा असायचा. एक दिवस सूनयनानेच कुशलला लग्नाचं विचारलं आणि त्याने देखील पटकन हो म्हटलं. दोघेही कलाकार असल्याने सूनयनाच्या घरी त्याचे येणे जाणे चालू झाले.
अगदी लसूण सोलून देणे, भाजी निवडणे ह्या गोष्टीची मदत तो करू लागला होता. स्ट्रगल करत असताना कुशल जवळ बसच्या प्रवासासाठी देखील पैसे नसायचे त्यावेळी सूनयना त्याच्या पाकिटात गुपचूप पैसे टाकायची. या दोघांच्या प्रेमाची गोष्ट घरी समजली त्यावेळी खूप राडा झाला होता. लग्नासाठी त्यांना परवानगी देखील मिळायला खूप वाट पाहावी लागली होती. अखेर खूप प्रयत्नानंतर त्या दोघांचा साखरपुडा ठरला. पण एक साधारण नोकरी करत असताना कुशल खूपच त्रस्त झाला होता. ही नोकरी मी सोडतोय असं सूनयनाच्या आईला सांगितलं तर तिच्या आईला काय करावं हेच नेमकं सुचत नव्हतं. आज होम मिनिस्टर मध्ये कुशल बद्रिके आणि सूनयनाच्या लग्नाची मजेशीर गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात विविध कलाकार आणि त्यांच्या सहचारिणीना आदेश बांदेकरांनी बोलतं केलं आहे. त्यात आता आदेश बांदेकर कुशल बद्रिकेच्या घरी गेले, त्यामुळे हा भाग पाहायला आणि त्यांच्या लग्नातील गमतीजमती ऐकायला प्रेक्षक देखील नक्कीच उत्सुक आहेत.