Breaking News
झिम्मा मराठी चित्रपट
झिम्मा मराठी चित्रपट
Home / जरा हटके / झिम्मा – मराठी चित्रपट २३ एप्रिलला प्रदर्शित होत आहे

झिम्मा – मराठी चित्रपट २३ एप्रिलला प्रदर्शित होत आहे

क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले अशी भली मोठी स्टारकास्ट असलेला आणि नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच आहे. या चित्रपटाची प्रस्तुती चलचित्र कंपनीने केली असून आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी फ्यू फिल्म्स यांनी निर्मिती केली आहे. प्रसिद्ध कलाकार हेमंत ढोमे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नाटक क्षेत्रात नेपथ्य आणि विविध भूमिका करणाऱ्या इरावती कर्णिक लिखित या चित्रपटाची निर्मिती क्षितीसह स्वाती खोपकर, अजिंक्य धमाळ, विराज गवस, अनुपाम मिश्रा, उर्फी काझमी यांनी केली आहे. झिम्मा चित्रपटाला अमितराज यांनी संगीतबद्ध केले असून संजय मेमाणे यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पहिले आहे.

हेमंत आणि क्षितीची ही ऑफस्क्रीन जोडी पहिल्यांदाच दिग्दर्शक -अभिनेत्री म्हणून झिम्मा निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचे poster प्रदर्शित झाल्यापासून या बहुचर्चित चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता होती. चित्रपटाच्या teaser ला प्रेक्षकांनी दणदणीत  प्रतिसाद दिला आहे. (Upcoming Marathi Movie Jhimma releasing on 23 April in all theatres after lockdown).

सिद्धार्थ चांदेकर याने चित्रपटाचे विशेष कौतुक करत प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे .

असं म्हणतात, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो…
आता या नव्या वर्षात,
नवे आपण,
खेळूया… ‘झिम्मा’
२३ एप्रिल पासून!!!

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.