Breaking News
Theater Day 27 March
Theater Day 27 March
Home / जरा हटके / जागतिक रंगभूमी दिन – २७ मार्च

जागतिक रंगभूमी दिन – २७ मार्च

जागतिक रंगभूमी दिन हा दरवर्षी २७ मार्च रोजी साजरा केला जातो. सर्वप्रथम इ.स. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे हा दिवस जगभर जाहीर केला गेला. त्यानुसार पहिला जागतिक रंगभूमी दिन इ.स. १९६२ मध्ये साजरा झाला. युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग म्हणून जगभरातील नाट्य विश्वातील प्रतिष्टीत एक व्यक्ती संदेश देते.  १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.

व्यक्ती आणि त्याची अभिनयातून संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द वापरला जातो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. फारपूर्वी आजच्यासारखे वैशिट्यपूर्ण बंदिस्त रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असत.

मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती.  वैदिक काळापासून ते आजचे कीर्तन, तमाशा, बहुरुपी, वीरकथा, तसेच कोकणातील दशावतारी नाटके, देवअसुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाटककला उदयास आली. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी फुलली.

मार्च आणि एप्रिल महिन्यात सादर होणाऱ्या नाटकांची नावे आणि प्रमुख कलाकार यादी

व्हॅक्युम क्लिनर – अशोक सराफ, निर्मिती सावंत, तन्वी पलव, मौसमी तोंडवलकर, सागर खेडेकर, प्रथमेश चेऊलकर

एक परफेक्ट मर्डरप्रिया मराठे, सतीश राजवाडे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, सुबोध पांडे, श्रीकांत प्रभाकर

धनंजय माने इथंच राहतात – प्रिया बेर्डे, स्वानंदी बेर्डे, प्रभाकर मोरे, मृग बोडस, चैतन्य सरदेसाई, निलय घैसास

खिडकी – जतीन सरना प्रियांका शर्मा

हरवलेल्या पत्त्यांचा बंगला – वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर, रंजन जोशी, दीप्ती लेले, अथर्व नकती, दिगदर्शन चंद्रकांत कुलकर्णी , लेखन स्वरा मोकाशी

एका लग्नाची पुढची गोष्ट – प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, परीक्षा शिवणकर, पराग डांगे

प्रेम करावं पण जपुन – भक्ती तारळेकर , विशाल तांबे, संकेत शेटगे, मृदुला कुलकर्णी

तू म्हणशील तसं – संकर्षण कऱ्हाडे, भक्ती देसाई, प्रिया करकमकर, अमोल कुलकर्णी

नाट्य क्षेत्रातील खंत”

बालरंगभूमीने नाटय व मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक दिग्गज कलावंत दिलेले आहेत. मराठी रंगभूमीला भरभराटी आणण्यासाठी मुलांमध्ये लहान वयापासूनच रंगभूमीची माहिती व आकर्षण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी सतत बालनाट्य शिबिरांची आवश्यकता असते. यातून कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिक निर्माण होण्याचे कार्य सहज घडू शकते. खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला सशक्त करण्याचे काम राज्यभरात होणाऱ्या बालनाट्य स्पर्धा आणि शिबिरातून होत असते असे म्हणायला हरकत नाही.आज पर्यंतच्या रंगभूमीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की, इंग्रजी नाटके मराठीत अनुवादित होतात. मात्र, मराठी नाटक इंग्रजीत अनुवादित होत नाहीत. विल्यम शेक्सपिअरची सर्व नाटके आपल्याकडे अनुवादित झाली आहेत. पण मराठीतील एकाही नाटककाराचे नाटक इंग्रजीत किंवा हिंदीत तयार केले गेलेले नाही. उत्तम मराठी नाटके लंडनमध्ये वगैरे सादर होतात. पण ती तिथल्या महाराष्ट्र मंडळांनी, म्हणजे आपल्याच स्वभाषीकांनी आपल्याला निमंत्रित केलेले असतात. इंग्रजांनी कधी आपल्याकडील एखादे नाटक सादर करण्यासाठी तेथे निमंत्रित केले आहे का? त्या ताकदीची कलाकृती निर्माण व्हायला हवी याची खंत वाटते.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.