कलर्स मराठीवरील स्वामीं महाराजांची महती सांगणाऱ्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अक्षय मुडावदकर, स्वानंद बर्वे, विजया बाबर, पूजा रायबागी, नित्य पवार व नीता पेंडसे या कलाकारांनी सहजसुंदर अभिनयाने ही मालिका गाजवली आहे. लवकरच या मालिकेतील अभिनेत्री विवाहबद्ध होत आहे. त्यामुळे या मालिकेच्या कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मालिकेत कालींदीचे पात्र विरोधी भूमिका दर्शवत आहे. चांदुलीला नेहमी त्रास देणारी कालींदी प्रेक्षकांच्या रोषाला नेहमीच सामोरी जाताना दिसली.
हे पात्र अभिनेत्री ‘पूजा रायबागी’ हिने निभावले आहे. पूजा ही मराठी नाट्य, चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री आहे. जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून तिला विरोधी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. लवकरच पूजा विवाहबद्ध होत आहे, फोर डेज टू गो असे म्हणत पूजाने प्रिवेडिंग फोटोशूट करत लग्नाची तारीख जाहीर केली आहे. अभिनेता प्रसाद दाबके हिच्यासोबत ती विवाहबद्ध होत आहे. आजपासून पूजा आणि प्रसादच्या लग्नाची लगबग सुरू होत आहे. या दोन दिवसात त्यांचा मेहेंदी सोहळा, हळद आणि संगीत सोहळा पार पडणार आहे. जय जय स्वामी समर्थ या मालिकेमुळे पूजा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे.
पूजा ही मुंबईतच लहानाची मोठी झाली, सुरुवातीला विविध नाट्यस्पर्धांमधून तिने सहभाग दर्शवला होता. अभिनयाचे धडे गिरवत असतानाच तिला तांडव या चित्रपटात डॅशिंग पोलीस अधिकारी कीर्ती पाटीलची भूमिका तिने निभावली होती. या भूमिकेसाठी पूजाला घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, लाठीकाठीचे महिनाभर प्रशिक्षण घेतले. जुन्नर मधील विनायक खोत यांच्याकडे प्रशिक्षण घेत असताना ती तिथेच गावी राहिली होती. पूजाने घेतलेली ही मेहनत चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. यदा कदाचित, खळी, ललित २०५, झुंड, फायरब्रँड, असंही होतं कधी कधी. संगीत मत्स्यगंधा, कानांची घडी तोंडावर बोट या नाटकातून आणि मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली.
मुंगी उडाली आकाशी या कादंबरीचे अभिवाचन तिने एका कार्यक्रमात केलं होतं. २८ डिसेंबर २०२१ रोजी पूजा रायबागी हिने प्रसाद दाबके सोबत साखरपुडा केला. प्रसाद दाबके हा देखील अभिनेता असून त्याला फोटोग्राफीची आणि चित्रकलेची देखील विशेष आवड आहे. स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेत तो महत्वाच्या भूमिकेत झळकला होता. गोपीनाथ पंत बोकील यांची भूमिका त्याने या मालिकेत निभावली होती. फक्त मराठीवरील सिंधू या लोकप्रिय मालिकेत देखील त्याने गंगाधर अष्टपुत्रेची भूमिका साकारली होती. हे दोघेही कलाकार आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत त्यानिमित्ताने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
Nice carecter