Breaking News
Home / मालिका / कार्तिकने फोटोत दाखवलेली दीपिकाची आई इनामदारांच्या घरी दाखल..

कार्तिकने फोटोत दाखवलेली दीपिकाची आई इनामदारांच्या घरी दाखल..

रंग माझा वेगळा या मालिकेने गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पुढे असलेली पाहायला मिळाली आहे. कार्तिक आणि दीपा एकत्र यावेत म्हणून दीपिका आणि कार्तिकीसोबत सौंदर्या देखील प्रयत्न करताना दिसत आहे. लवकरच त्यांनी दीपा आणि कार्तिकसाठी एक प्लॅन आखला आहे. कॅम्पमुळे तरी हे दोघे एकत्र येतील अशी आशा सौंदर्याला वाटत आहे. मात्र एकीकडे हे दोघे कधी एकत्र येणार असे वाटत असतानाच मालिकेत एक नवा ट्विस्ट देण्यात आला आहे. कार्तिकने दीपिकाला एक फोटो दाखवून ही तुझी आई आहे असे म्हटले होते.

deepa mother
deepa mother

दीपिका सतत आई बद्दल विचारत असे, त्यामुळे कार्तिकने एक फोटो दीपिकाला तिची आई म्हणून दाखवलेला असतो. मात्र श्वेताला हे चांगलेच माहीत असते की कार्तिक दीपिकाला खोटं बोललेला आहे. कार्तिक उघड उघड खोटं बोलतोय हे श्वेताला मुळीच पटलेले नसते त्यावरून ती आदित्यशी वाद घालत असते. मी जर कधी खोटं बोलले तर कोणालाच सहन होत नाही पण कार्तिकही खोटं बोलतोय आणि त्याला कुणी काहीच का बोलत नाही याचा तिला राग आलेला असतो. फोनवर बोलत असताना श्वेताला कुणाचा तरी धक्का लागतो. त्यावरून ती मुलगी श्वेताची माफी मागते परंतु ही तीच मुलगी असते जीचा फोटो कार्तिकने दीपिकाची आई म्हणून दाखवलेला असतो.

rang maza vegala tv serial
rang maza vegala tv serial

मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये ही मुलगी आता दीपिकाची आई बनून इनामदारांच्या घरी दाखल झालेली पाहायला मिळणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट कार्तिकच्या अंगलट येणार अशीच चिन्ह आता प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहेत. दीपिकाची आई बनून ही मुलगी आता आणखी कुठले कारस्थान रचणार याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्थात यामागे श्वेताचा नक्कीच हात असणार अशी खात्री मालिकेच्या प्रेक्षकांना वाटत आहे. ही मुलगी कोण आहे आणि ती असे कोणाच्या बोलण्यावरून वागत आहे हे मालिकेतून लवकरच उलगडताना दिसणार आहे. त्यामुळे मालिकेचा हा ट्विस्ट नेमका कसा असणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.