Breaking News
Home / मराठी तडका / मराठी चित्रपट रसिकांनी तुम्हाला कधीच माफ नसतं केलं.. प्रवीण तरडेंबद्दल मराठी दिग्दर्शकाचं वक्तव्य

मराठी चित्रपट रसिकांनी तुम्हाला कधीच माफ नसतं केलं.. प्रवीण तरडेंबद्दल मराठी दिग्दर्शकाचं वक्तव्य

आनंद दिघे यांचा जीवनपट धर्मवीर चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केला. प्रसाद ओकचे कास्टिंग अचूकपणे निवडून कौतुकाची थाप मिळवून घेतली. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवत आहे. ही भूमिका प्रसाद ओकच्या अगोदर पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने करणार होते अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. खरं तर ह्या भूमिकेसाठी प्रवीणने विजू माने यांनाच प्रथम प्राधान्य दिले होते. मात्र ही भूमिका करण्यास त्यांनी नकार दिला होता. यावरून विजू माने यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ‘प्रवीण विठ्ठल तरडे, मराठी चित्रपट रसिकांनी तुम्हाला कधीच माफ नसतं केलं.’

prasad oak pravin tarde
prasad oak pravin tarde

मराठी चित्रपटसृष्टीतील एक माईलस्टोन ठरलेला ‘धर्मवीर’ चित्रपट. मी ‘पांडू’ सिनेमा चित्रित करत असताना माझ्या कानावर आलं की प्रवीण तरडे ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट करतोय. सिनेमाचं शूट संपल्यावर पांडूचं प्रमोशन सुरू झालं. आणि प्रवीण म्हणाला विजू धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका करशील का? कारण तू त्यांना जवळून पाहिले आहेस. त्यांचा सहवास बराच तुला लाभला आहे. तुला त्यांची प्रत्येक वृत्ती, देहबोली, नजर, लकबी माहिती आहे. मी हसलो, मला वाटलं प्रवीण माझी मस्करी करतोय. प्रवीणला मी म्हणालो, तुला जी हवी ती मदत मी करेन त्यासाठी असं काही बोलायची गरज नाही. तो विषय टाळून आम्ही पुढे गेलो. पण प्रवीणने पुन्हा एकदा प्रमोशनच्या निमित्ताने भेटलो असता विषय काढला.

dharmaveer anand dighe eknath shinde
dharmaveer anand dighe eknath shinde

अरे विजू ऑडिशन कधी देतोयस, मी म्हटलं कसली? तर म्हणाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या रोलची. अरे वेडा आहेस का? त्या व्यक्तीचं चरित्र साकारणं? तेवढा बरा अभिनेता मी नाही आणि जे मला जमणार नाही ते मी कधीच करणार नाही. माझ्या नकाराबद्दल तुला जरी वाईट वाटलं तरी हा निर्णय मी ठामपणे घेतलेला आहे. तुही असा विचार करू नकोस, खूप चांगले अभिनेते मराठी चित्रपट सृष्टीत आहेत. आणि त्याला प्रसाद ओक दिसला, इतिहास घडला. ‘धर्मवीर’ सिनेमा पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी जर प्रवीण तरडेला होकार कळवला असता, तर त्या सिनेमाचं काय होऊ शकलं असतं. इतका अप्रतिम सिनेमा झालाय. प्रसादच्या अभिनयानं तो एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे.

एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे ‘धर्मवीर’ या सिनेमापासून मराठी चित्रपटसृष्टीत प्रसादपर्व सुरू होणार आहे. प्रसाद माझा लाडका अभिनेता आहेच, चांगला मित्र आहे. शिवाय माझ्या ‘ती रात्र’, ‘खेळ मांडला’, ‘शिकारी’ अशा सिनेमांमध्ये तो प्रमुख भूमिकेत आहे. मला नेहमी असं वाटायचं की चित्रपटसृष्टीत अभिजीत चव्हाण आणि प्रसाद यांना क्षमता सिद्ध करणारं काम मिळालेलं नाही. धर्मवीर सिनेमा पाहताना अभिनयाने ‘पडदा व्यापून टाकला’ म्हणजे काय हे कळतं. मला तर अनेकदा शंका यायची प्रसादच्या अंगात प्रत्यक्ष दिघे साहेब यायचे की काय. मी एकदा सहज सेटवरही गेलो होतो, प्रसाद माझ्याशी गप्पा मारत होता. अचानक टेक सुरू झाला, प्रसादने डोळे बंद केले आणि कॅमेरासाठी डोळे उघडले. ते मला प्रसादचे वाटलेच नाहीत, ते धर्मवीरांचे होते.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.