Breaking News
Home / मराठी तडका / “हे बघ भावा तुझा पोरगा दोषी”… अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
kiran mane aaryan shahrukh khan
kiran mane aaryan shahrukh khan

“हे बघ भावा तुझा पोरगा दोषी”… अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते किरण माने यांनी नुकतीच शाहरुख खानच्या भावनांबाबत एक पोस्ट लिहिली आहे. आर्यनच्या झालेल्या अटकेवरून आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे शाहरुख खान मात्र मिडियापासून जरा जपून राहिलेला पाहायला मिळतो आहे. मुलावर झालेल्या आरोपांवर आजवर कुठलीही प्रतिक्रिया न देणारा शाहरुख खान कुठल्या परिस्थिशी तोंड देत असेल याचे भाष्य करणारी किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते पाहुयात…

kiran mane aaryan shahrukh khan
kiran mane aaryan shahrukh khan

“हे बघ भावा, तुझा पोरगा दोषी असंल तर कायद्यानं त्याला काय शिक्षा होईल ती भोगावी लागंल…पर्याय नाय. पन त्यो जर निर्दोष आसंल तर कुनाच्या बापाचा बाप बी त्याला शिक्षा करू शकत नाय ! कायद्यापेक्षा मोठ्ठा मानूस पैदा झाला नाय या देशात अजून… पन नशिबाशी चाललेल्या या लढाईत तू जो संयम ठेवलायस तो पाहून तुझा लै लै लै अभिमान वाटला गड्या. तू मिडीयाफुडं यिवून घसा फाडून सोत्ताची बाजु मांडायचा धसमुसळेपना केला नाय… कुठल्या राजकीय नेत्याच्या किंवा पक्षाच्या वळचनीला जाऊन पोराच्या सुटकेची भिक मागीतली नाय.. या देशातल्या कुठल्याबी अधिकार्‍याचं डोळं पांढरं होत्याल एवढा पैसा चारून तू आत्तापर्यन्त पोराला बाहेर काढू शकला असतास.. पन तू ते नाय केलंस ! तू लाच दिली असतीस तर पयल्याच सुनावनीला तो बाहेर असता.. तू तारीख पे तारीख सहन करत वाट पहातोयस… कारन तुझा या देशातल्या ‘कायद्या’ वर विश्वास हाय !

actor kiran mane
actor kiran mane

आपलं पोटचं पोर असल्या आरोपात अडकनं आनि आपन काहीच न करू शकनं याचं दु:ख – याची वेदना काय असते, ती ओळखायला आपन स्वत: मोठ्या मनाचा ‘बाप’ असनं गरजेचं असतं ! कद्रू मनाची बांडगुळं मनाला यिल ती टीका करत्यात ती ऐकून तुझ्या काळजाला घरं पडत असत्याल… तू एकांतात हतबल होऊन रडतही असशील… पन तू बादशाह हायेस भावा… किंग खान हायेस… ते तू दाखवून देनार !! आमचा तुझ्यावर विश्वास आहे… जे समोर येईल त्याला तू निधड्या छातीनं सामोरा जाशील !!!
लढ भावा लढ.. तू लढवय्या हायेस.. तुझ्या पोरानं गुन्हा केला असंल तर त्याला शिक्षा होईल. त्याचं खापर तुझ्यावर फोडन्याइतके भंगार मेंदूचे आम्ही नाही आहोत. तुझा पोरगा निर्दोष ठरला तर मात्र तुझ्यावर खोटे आरोप करनार्‍यांची थोबाडं ठेचली जानार आहेत…

त्यावेळीबी तू ‘माज’ करनार नाहीस याची खात्रीय आमाला… कारन तू खर्‍या अर्थानं ‘शाह’-रूख आहेस.. राजा आहेस.. हार कर जीतने वाला ‘बाजीगर’ आहेस ! लब्यू दोस्ता – किरण माने.” अभिनेता किरण माने नेहमीच बिनधास्त मनाने पोस्ट लिहीत असतात त्यातलीच त्यांची ही पोस्ट देखील त्याच परिस्थितीचा ठाव घेणारी नक्कीच आहे अशी प्रतिक्रिया य पोस्टवर दिलेली पाहायला मिळत आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.